¶ उज्जीया राजा मरण पावला त्या वर्षी मी प्रभूला सिहांसनावर बसलेले पाहीले; तो उंच आणि उंच चढविलेला होता; आणि त्याच्या झग्याच्या सोग्यांनी मंदीर भरून गेले होते.
TSK
TSK · प्रेषि 7:55
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
परमेश्वर देवाचे गौरव करुबावर उठून घराच्या उंबरठ्यावर आले, आणि वेशी परमेश्वर देवाच्या प्रकाशाने चमकू लागल्या. त्याने घर भरुन गेले आणि वेशी देवाच्या गौरवाने प्रकाशू लागल्या.
शहराच्या मध्य भागातून परमेश्वर देवाचे गौरव वर निघून गेले, आणि शहराच्या पूर्व भागात पर्वतावर स्थिर उभे राहीले.
¶ मग प्रभू येशू त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर तो स्वर्गात घेतला गेला आणि देवाच्या उजव्या बाजूस जाऊन बसला.
‹आणि, मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्याजवळ घेईन; यासाठी जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.›
तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली, तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.
तर बंधुजनहो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात, प्रतिष्ठीत पुरूष शोधून काढा, त्यांना आम्ही या कामावर नेमू.
¶ स्तेफन कृपा व सामर्थ्य ह्यांनी पूर्ण होऊन, लोकात मोठी अद्भूते व चिन्हे करत असे.
पण शौल, ज्याला पौलहि म्हणत, तो पवित्र आत्म्याने भरला होता, पौलाने त्याच्याकडे रोखून पाहिले व म्हणाला.
मला एक ख्रिस्तातील मनुष्य माहीत आहे; तो चौदा वर्षांपूर्वी (शरीरात की शरीराबाहेर हे मला माहीत नाही, देवाला माहीत आहे) तिसर्या स्वर्गापर्यंत नेला गेला.
¶ आम्ही जे सांगत आहोत त्याचा मुद्दा असा आहे की, जो स्वर्गामध्ये देवाच्या राजासनाच्या उजव्या बाजूस बसलेला असा महायाजक आम्हास लाभलेला आहे,
¶ ह्यानंतर मी पाहिले तो पाहा, स्वर्गात एक दरवाजा माझ्यासमोर उघडलेला दिसला आणि अगोदर जसा आवाज मी माझ्याशी बोलताना ऐकला होता तसाच आवाज मी ऐकला. तो आवाज कर्ण्याच्या आवाजासारखा होता. तो म्हणाला, ‹“इकडे वर ये आणि मी तुला यानंतर जे घडणार आहे ते दाखवितो.”›