¶ तेव्हा परमेश्वर देवाने मनुष्यास हाक मारुन म्हटले, “तू कोठे आहेस?”
TSK
TSK · प्रेषि 9:4
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
परंतु तेवढ्यात, परमेश्वराच्या दूताने स्वर्गातून हाक मारून त्यास म्हटले, “अब्राहामा, अब्राहामा!” अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे.”
त्या लोकांपासून दूर जा म्हणजे मी त्यांचा नाश करीन ताबोडतोब. मोशे आणि अहरोन यांनी त्यांचे चेहरे जमिनीपर्यंत लववून दंडवत घातले.
कारण, सेनाधीश परमेश्वराने माझे गौरव केले आणि तुम्हास लुटणाऱ्या राष्ट्रांविरूद्ध मला पाठवले आहे; जो कोणी तुला स्पर्श करतो तो देवाच्या डोळ्याच्या बुबुळाला स्पर्श करतो! परमेश्वराने हे केल्यानंतर, तो म्हणाला,
‹मग राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हास खरे सांगतोः माझ्या अनुयायांतील लहानातील लहानाला काही करण्याचे जेव्हा जेव्हा तुम्ही नाकारले, तेव्हा तेव्हा ते तुम्ही मला करण्याचे नाकारले.›
‹“तो मीच आहे,”› असे म्हणताच ते मागे सरकून जाऊन जमिनीवर पडले.
¶ मग त्यांची न्याहरी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, ‹“योहानाच्या पुत्रा शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?”› तो त्यास म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्यास म्हणतो, ‹“माझी कोकरे चार.”›
तेव्हा मी जमिनीवर पडलो आणि ‹“शौला, शौला, माझा छळ का करितोस?”› अशी वाणी माझ्याबरोबर मी बोलताना ऐकली.
तर तू देवाची दया आणि छाटणी बघ. जे पडले त्यांच्यावर छाटणी, पण, तू जर दयेत राहिलास तर तुझ्यावर दया; नाही तर, तूही छाटला जाशील.
¶ कारण शरीर ज्याप्रमाणे एक असून त्याचे अवयव पुष्कळ असतात आणि एका शरीराचे अवयव पुष्कळ असून एक शरीर असते त्याप्रमाणेच ख्रिस्त आहे.