¶ कोरेश पारसाचा राजा असताना पहिल्याच वर्षी परमेश्वराने त्यास एक फर्मान काढायला प्रेरणा दिली. यिर्मयाच्या तोंडून वदवलेली भविष्यवाणी प्रत्यक्षात येण्यासाठी परमेश्वराने त्यालाही स्फूर्ती दिली. कोरेशने आपल्या दूताकरवी राज्यभर असा संदेश पाठवला की,
TSK
TSK · दानि 10:1
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
त्यांनी दगडकाम करणाऱ्यांना आणि सुतारांना चांदी दिली आणि त्यांना पारसाचा राजा कोरेश याच्या परवानगीने गंधसरूची लाकडे लबानोनातून याफोच्या समुद्रास आणावी म्हणून सोरी आणि सीदोनाच्या लोकांस अन्न, पेय व तेलही दिले.
पारसाच्या कोरेश राजाची सर्व कारकीर्द संपून दारयावेश राजा सत्तेवर येईपर्यंत त्यांची योजना उधळून लावण्यासाठी ते वकीलाला लाचही देत.
¶ “कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी यरूशलेममधील मंदिराच्या बाबतीत राजाने असा आदेश दिला की, जेथे यज्ञ अर्पण करीत त्याठिकाणी देवाचे मंदिर बांधावे. ‘मंदिराचा पाया बांधून काढावा. त्याच्या भिंतीची उंची साठ हात आणि रुंदी साठ हात असावी.
जो कोरेशाविषयी म्हणतो, तो माझा मेंढपाळ आहे, तो माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करील. तो यरूशलेमेविषयी म्हणेल, ती पुन्हा बांधण्यात येईल आणि मंदिराविषयी म्हणेल, तुझा पाया घातला जाईल.
¶ मग या चार तरुणास देवाने ज्ञान आणि सर्व प्रकारच्या शास्त्रांचा समज आणि शहाणपण दिले, आणि दानीएलास सर्व प्रकारचे स्वप्न व दृष्टांत उलगडत असत.
तो समय आणि ऋतु बदलतो, तो राजास काढतो आणि दुसऱ्यास सिंहासनावर बसवून राजे करतो; तो ज्ञान्यास आणि विवेकवंतास शहाणपण देतो.
उत्तम आत्मा, ज्ञान, विवेक, स्वप्नांचा उलगडा करणे, कोडी स्पष्ट करणे, आणि अडचणी सोडवणे, या गुंणवत्ता ज्या दानीएलात आढळल्या त्यास बेल्टशस्सर नाव दिले. आता त्या दानीएलाला बोलवा म्हणजे तो अर्थ सांगेल.”
¶ मग हा दानीएल दारयावेशाच्या राज्यात आणि कोरेश पारसीच्या कार्यकाळात समृध्द झाला.
¶ हा सांज-सकाळाचा दृष्टांत सांगितला तो खरा आहे पण तू हा गुप्त ठेव कारण तो भविष्यात अनेक दिवसानंतर पूर्ण होईल.”
तुझ्या विनंत्यांच्या आरंभी वचन निघाले, आणि ते प्रगट करायला मी आलो आहे, कारण तू फारच प्रिय आहेस; म्हणून या गोष्टीचा विचार कर आणि दृष्टांत समजून घे.
¶ आणि आता मी तुला सत्य प्रगट करतो. पारसात तिन राजे उदयास येतील आणि चौथा राजा इतरांपेक्षा जास्त धनवान होईल जेव्हा तो आपल्या धनाच्या मदतीने बलवान झाला मग तो सर्वांस ग्रीसच्या राज्याच्या विरोधास उठवील.
तो म्हणाला, दानीएला स्वस्थ रहा, कारण ही वचने मुद्रित करून अंतसमयापर्यंत गुप्त ठेवण्यात आली आहे.
¶ आणि तो देवदूत मला म्हणाला, “लिहीः कोकऱ्याच्या लग्नाच्या भोजनाला बोलावलेले धन्य होत.” आणि तो मला म्हणाला, “ही देवाची खरी वचने आहेत.”