TSK

TSK · दानि 10:13

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

पारसाच्या कोरेश राजाची सर्व कारकीर्द संपून दारयावेश राजा सत्तेवर येईपर्यंत त्यांची योजना उधळून लावण्यासाठी ते वकीलाला लाचही देत.

¶ तो म्हणाला, मी तुझ्याकडे का आलो हे तुला ठाऊक आहे काय? आता मी परत जाऊन पारसाच्या अधिपतीबरोबर लढणार, मी गेलो म्हणजे ग्रीसचा अधिपती येईल.

¶ देवदूताने मला दाखवले, मुख्य याजक यहोशवा परमेश्वराच्या दूतापुढे उभा होता आणि सैतान त्यास दोष करण्यासाठी त्याच्या उजवीकडे उभा होता.

तो सर्व सत्ता व शक्ती ह्यांवर मस्तक असून त्याच्याठायी तुम्ही पूर्ण झाला आहा,

तो स्वर्गात गेला असून देवाच्या उजवीकडे आहे आणि देवदूत, अधिकारी व सत्ताधीश त्याच्या अधीन आहेत.

¶ आणि स्वर्गात युद्ध झाले; मिखाएल व त्याचे दूत हे अजगराबरोबर लढले आणि अजगर व त्याचे दूत हे सुद्धा त्यांच्याशी लढले.