TSK

TSK · दानि 10:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ आणि हे ऐकताच मी खाली बसलो व रडू लागलो आणि कित्येक दिवस मी शोक व उपवास केला आणि स्वर्गीय देवापुढे प्रार्थना केली.

कारण तू माझ्या सामर्थ्याचा देव आहेस; तू मला का दूर केले आहे? शत्रूंच्या जुलूमाने मी का शोक करत फिरू?

यरूशलेमेवर प्रेम करणारे, तुम्ही सर्व तिच्याबरोबर हर्ष करा आणि तिच्यासाठी उल्लास करा. जे तुम्ही तिच्यासाठी शोक करता, ते तुम्ही सर्व तिच्याबरोबर आनंदाने हर्ष करा.

¶ सत्तर सप्तकांचा काळ तुझ्या लोकांसाठी आणि तुझ्या शहरासाठी घोषीत करण्यात आला होता; ज्यात पापाचा अंत व्हावा, अधार्मिकतेसाठी प्रायश्चित करावे, सनातन धार्मिकता उदयास यावी, दृष्टांत व स्वप्न पूर्ण व्हावे आणि पवित्रस्थानाचा अभिषेक व्हावा.

की, मला मोठे दुःख होत आहे आणि माझ्या अंतःकरणात सतत राहणारी यातना आहे.

जर एखादी व्यक्ती त्या साक्षीदारांना अपाय करू इच्छीत असल्यास त्यांच्या तोंडातून अग्नी निघून त्यांच्या शत्रूंना खाऊन टाकतो. जो कोणी त्यांना इजा करण्याची इच्छा धरील त्यास ह्याप्रकारे अवश्य मारावे.