TSK

TSK · दानि 2:47

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तेव्हा फारो योसेफास म्हणाला, “देवाने तुला या सर्व गोष्टी दाखवल्या आहेत, म्हणून तुझ्यासारखा समंजस व शहाणा दुसरा कोणी नाही.

जो समर्थ देव परमेश्वर! जो समर्थ देव परमेश्वर! तो जाणतो; आणि इस्राएल, तोसुद्धा जाणील; हे बंड असल्यास किंवा हे परमेश्वराविरुद्ध उल्लंघन असल्यास तू आज आम्हांला वाचवू नकोस;

तो याजकांचे सामर्थ्य काढून घेतो आणि मंदिरातील सेवकांना फारसे महत्व देत नाही.

खरोखर, सर्व राजे त्याच्यापुढे नमन करोत; सर्व राष्ट्रे त्याची सेवा करोत;

कारण परमेश्वर महान आणि परमस्तुत्य आहे. सर्व दुसऱ्या देवांपेक्षा त्याचे भय धरणे योग्य आहे.

माझ्याद्वारे राजे सरदारसुद्धा राज्य करतात आणि सर्व अधिकारी न्यायाने कारभार चालवतात.

तो गुढ आणि गहन गोष्टी प्रगट करतो, कारण अंधारात काय आहे हे तो जाणतो, आणि प्रकाश त्यामध्ये वसतो.

राजा आपण, राजाधिराज आहात ज्यास स्वर्गाच्या देवाने राज्य, सामर्थ्य, बल आणि सन्मान दिला आहे.

¶ हा निर्णय त्या देवदुताच्या घोषणेद्वारे आणि पवित्रजनांच्या विचाराने झाला आहे, यासाठी की मनुष्याच्या राज्यात परात्पर प्रभुत्व करतो, आणि ज्या कोणाला ते द्यायला तो इच्छितो त्यास तो ते देतो, आणि त्यावर मनुष्यातल्या सर्वांहून नीच अशा मनुष्यास तो स्थापतो, असे जिवंतांनी जाणावे.

तुला लोकातून काढून टाकण्यात येईल तुझी वस्ती वनपशूत होईल तुला बैलांसारखे गवत खावे लागेल आणि मानवी राज्यावर देवाची सत्ता आहे, तो ते पाहिजे त्यांना देतो, हे तुला ज्ञान होईपर्यंत सात वर्षे जातील.”

खरोखर आपला बेत त्याच्या सेवकांना म्हणजेच संदेष्ट्यांना प्रगट केल्यावचून, प्रभू परमेश्वर काहीच करणार नाही.

आणि येशू ख्रिस्त विश्वासू साक्षी जो मरण पावलेल्यांमधून प्रथम जन्मलेला आणि पृथ्वीवरील राजांचा तो अधिपती आहे आणि ज्या येशूने आमच्यावर प्रीती केली आणि ज्याने आपल्या रक्ताने आमच्या पापांतून आम्हास मुक्त केले;

त्याच्या झग्यावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असे नाव लिहिलेले आहे.