TSK

TSK · दानि 7:24

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

त्यानंतर मी रात्री माझ्या स्वप्नात चौथे श्वापद पाहीले, विक्राळ, भयानक आणि अतिशय मजबूत असे ते होते. त्यास मोठे लोखंडी दात होते, ते सर्व काही चावून त्याचा चुरा करी. आणि उरलेले पायाखाली तुडवी ते इतरांपेक्षा वेगळे होते. आणि त्यास दहा शिंगे होती.

¶ त्यातल्या एकातून एक लहान शिंग निघाले मग ते दक्षिणेस पुर्वेस आणि इस्राएलास गौरवी प्रदेशात वाढत गेले.

कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका; कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनीतिमान पुरूष, नाशाचा पुत्र प्रकट होईल;

¶ आणि स्वर्गात दुसरे एक चिन्ह दिसले. पाहा! तेथे एक मोठा, लाल अजगर; त्यास सात डोकी व दहा शिंगे होती आणि त्याच्या डोक्यांवर सात मुकुट होते.

तेव्हा दूताने मला पवित्र आत्म्यामध्ये अरण्यात नेले; आणि मला एका किरमिजी रंगाच्या पशूवर बसलेली एक स्त्री दिसली. तो देवनिंदात्मक नावांनी भरलेला होता आणि त्यास सात डोकी व दहा शिंगे होती.

आणि तू बघितलीस ती दहा शिंगे आणि तो पशू त्या वेश्येचा द्वेष करतील. तिला ओसाड आणि नग्न करतील, तिचे मांस खातील आणि तिला अग्नीत जाळतील.