TSK

TSK · दानि 8:9

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

सियोन डोंगर, जो थोर राजाची नगरी आहे, पृथ्वीच्या बाजूस आहे, त्याचे सौंदर्य उच्चतेवर, सर्व पृथ्वीवर आनंद आणते.

मी म्हणालो, मी तुला लेकरांमध्ये कसे ठेवीन? आणि रमणीय देश, म्हणजे राष्ट्रांच्या सैन्याचे सुशोभित वतन, तुला कसे देईन? तेव्हा मी म्हटले तुम्ही मला माझ्या ‘पिता’ असे म्हणाल व मला अनुसरण्यापासून मागे फिरणार नाही.

म्हणून मी माझा हात उंचावून रानात प्रतिज्ञा वाहिली; जो देश त्यांना देण्यासाठी ज्यामध्ये दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत, जो सर्वात सुंदर असून सर्व देशाचा मुकुटमणी आहे, अशा देशात मी त्यांना घेऊन जाणार नाही.

मला त्याची दहा शिंगे आणि त्याचे गुढ जाणायचे होते जी त्याच्या डोक्यावर होती. एक शिंग त्यामध्ये आणखी निघाले त्यामुळे तीन शिंगे तूटून पडली त्या शिंगाला डोळे असून तोंड होते त्यातून ते मोठमोठ्या गोष्टी बोलत होते. त्या शिंगाची जाडी इतरांपेक्षा जास्त होती. या सगळ्यांचा अर्थ काय म्हणून मी इच्छा दर्शविली.

¶ तो सर्वोच्च देवाच्या विरोधात बोलेल, आणि देवाच्या पवित्र जनांचा छळ करील नेमलेले सण आणि नियम बदलण्याचा तो प्रयत्न करील. या सर्व गोष्टी त्याच्या हातात तिन वर्षे आणि सहा महिण्यासाठी दिल्या जातील.

पण उत्तरेचा राजा मनात येईल तसे दक्षिणेच्या राजाशी करील त्यास कोणी थांबवू शकणार नाही, त्या सुंदर भूमीवर तो हाती नाश घेऊन उभा राहील.

¶ दक्षिणेच्या राज्याशी तो लढण्यास पूर्ण शक्तीने तयारी करेल दक्षिणेचा राजा मोठा फौजफाटा घेऊन युध्द करेल पण कटकारस्थानामुळे त्याचा निभाव लागणार नाही.