TSK

TSK · अनु 11:8

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

त्याचवेळी तुम्ही ज्या देशात वस्ती करणार होता, तेथे पाळण्यासाठी आणखीही काही विधी नियम परमेश्वराने मला तुम्हास शिकवण्यास सांगितले.

¶ आता, हे इस्राएल लोकहो! तुम्ही तुमचा देव परमेश्वर याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गांने चालावे, आणि त्याच्यावर प्रीती करावी, आणि तुम्ही आपल्या सर्व हृदयाने आणि आपल्या सर्व जिवाने परमेश्वर तुमचा देव याची सेवा करावी.

सर्व तऱ्हेची समृद्धी असताना तुम्ही आनंदाने व उत्साहित मनाने तुमचा देव परमेश्वर ह्याची सेवा केली नाही म्हणून

मग नूनचा मुलगा यहोशवा याला परमेश्वर म्हणाला, “हिंम्मत धर, खंबीर राहा. मी वचनपूर्वक देऊ केलेल्या प्रदेशात तू या इस्राएलांना घेऊन जाशील. मी तुझ्याबरोबर राहीन.”

परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकाराची मी कशी परतफेड करू?

पण जे कोणी परमेश्वराची प्रतीक्षा करतात ते त्यांची नवीन शक्ती संपादन करतील; ते गरुडासारखे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत; ते चालतील तरी गळून जाणार नाहीत.

आणि त्याने मला म्हणले की, ‹‘माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणात माझे सामर्थ्य पूर्ण होते.’› म्हणून, फार आनंदाने, मी माझ्या अशक्तपणात अभिमान मिरवीन, म्हणजे ख्रिस्ताचे सामर्थ्य माझ्यावर रहावे;

¶ शेवटी, प्रभूमध्ये बलवान होत जा आणि त्याच्या सामर्थ्याने सशक्त व्हा.

आणि तुम्हास सर्व धीर व आनंद देणारी सहनशीलता मिळण्यास त्याच्या गौरवाच्या बळाप्रमाणे तुम्हास संपूर्ण सामर्थ्य मिळून तुम्ही समर्थ व्हावे;