TSK

TSK · अनु 12:21

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तुमचा देव परमेश्वर तुमच्या सर्व वंशातून एक स्थान निवडून घेईल. आपल्या नावाची स्थापना तेथे करील. ते त्याचे खास निवासस्थान असेल. तेथे तुम्ही उपासनेसाठी जात जा.

तथापि, तुम्ही राहता तेथे हरीण, सांबर असे कोणतेही चांगले प्राणी मारुन खाऊ शकता. तुला तुझा देव परमेश्वर याने आशीर्वाद दिल्याप्रमाणे ते हवे तितके खा. हे मांस शुद्ध, अशुद्ध अशा कोणत्याही लोकांनी खावे.

देव आपले निवासस्थान निवडील तेथेच व सूर्यास्त होण्याच्या वेळीच ते केले पाहिजे. मिसरमधून परमेश्वराने तुम्हास बाहेर काढल्याप्रित्यर्थ वल्हांडण सण आहे.

तेथील परमेश्वराने दिलेल्या शेतजमिनीचे सर्व प्रथम उत्पन्न गोळा करून घरी आणाल. तेव्हा पहिले पीक टोपल्यात भरुन त्या घेऊन तुमचा देव परमेश्वर ह्याने निवडलेल्या त्याच्या पवित्र निवासस्थानी जा.

रहबामाने यरूशलेमामध्ये आपले सामर्थ्य वाढवले व राज्य केले. तो राज्यावर आला तेव्हा एक्के चाळीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमामध्ये सतरा वर्षे राज्य केले, इस्राएलच्या सर्व वंशांमधून परमेश्वराने यरूशलेमची निवड केली होती. आपले नाव रहावे म्हणून त्याने यरूशलेम निवडले होते. रहबामाच्या आईचे नाव नामा; नामा अम्मोनीण नगरातली होती.