TSK

TSK · अनु 28:36

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तेथे तुम्ही मनुष्यांनी घडवलेल्या दगडी अगरलाकडी दैवतांची, जे पाहू शकत नाहीत, ऐकत नाहीत, खात नाहीत की वास घेत नाहीत अशांची सेवा कराल.

परंतु जर तुम्ही वाईट करण्याचे चालूच ठेवाल तर तुम्ही आणि तुमचा राजा दोघे नष्ट व्हाल.”

होशेच्या नवव्या वर्षी अश्शूरच्या राजाने शोमरोन हस्तगत केले आणि इस्राएल लोकांस त्याने कैद करून अश्शूरला नेले. त्यांना त्याने हलहा येथे तसेच गोजानमधील हाबोर नदीजवळ आणि माद्य लोकांच्या नगरात ठेवले.

बाबेल देशाच्या लोकांनी राजा सिद्कीयाला धरुन रिब्ला येथे आपल्या राजाकडे नेले. या लोकांनी सिद्कीयाला जबर शासन करण्याचे ठरवले.

बाबेलाच्या राजाने त्या सर्वांची हमाथ देशातील रिब्ला येथे हत्या केली. अशाप्रकारे यहूदी यांना आपल्या भूमीतून बंदीवान म्हणून जावे लागले.

बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदावर हल्ला केला. त्याने त्यास कैद केले आणि त्यास बेड्या ठोकल्या. तशा अवस्थेत त्यास नबुखद्नेस्सरने बाबेलला नेले.

अजूनही हयात असलेल्या व तलवारीपासून वाचलेल्या लोकांस नबुखद्नेस्सरने बाबेलला नेऊन गुलाम केले. पुढे पारसाचे राज्य येऊन त्यांनी बाबेलचा पराभव करेपर्यंत हे गुलाम तेथेच राहिले.

यास्तव सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, “मी या लोकांस कडू दवणा खायला लावीन आणि विषारी पाणी प्यायला लावीन.

¶ कारण यहूदाचा राजा योशीयाचा मुलगा शल्लूम ह्याच्याबद्दल परमेश्वर असे म्हणतो: जो त्याचा पिता योशीया याच्याठिकाणी राज्य करीत होता, त्याने आपले ठिकाण सोडले आहे आणि तो परत येणार नाही.

¶ पण यहूदाचा राजा सिद्कीया हा त्या अतिशय नासल्यामुळे खाण्यालायक न राहिलेल्या अंजिरासारखा असेल. सिद्कीया त्याचे उच्चपदस्थ अधिकारी, यरूशलेममध्ये उरलेले लोक व मिसरमध्ये राहत असलेले यहूदी त्याना मी सोडून देईन, असे परमेश्वर म्हणतो.

पण खास्द्यांच्या सैन्याने राजाच्या पाठीस लागून यरीहोच्या मैदानात सिद्कीयाला गाठले. त्याचे सर्व सैन्य त्याच्यापासून पांगून दूर गेले.

आमच्या दृष्टीने जो राजा सर्वश्रेष्ठ होता जो परमेश्वराचा अभिषिक्त, आमच्या नाकपूड्यातील श्वास. त्यांच्या खाचेत पकडला गेला. ज्याच्या बद्दल आम्ही असे म्हणालो की, “आम्ही त्याच्या सावलीत राहू. तो इतर राष्ट्रापासून आमचे रक्षण करतो.”

त्यांच्यातला राजा अंधारात सामान आपल्या खांद्यावर घेऊन जाईल आणि तो वेशीच्या बाहेर निघून जाईल. तो वेशीला भगदड पाडून आपले सामान घेऊन जाईल, तो आपले तोंड झाकील, त्यामुळे आपल्या डोळ्यांनी जमीन बघणार नाही.

मग त इस्राएलाच्या घराण्या परमेश्वर देव असे म्हणत आहे, प्रत्येक जण त्यांच्या मूर्ती मागे गेले आहेत, त्यांची उपासना करून त्यांनी माझे ऐकण्याचे नाकारले आहे, पण तू आता माझ्या पवित्र वस्तूबद्दल मूर्तीला भेट देऊन यापुढे माझा अनादर करणार नाही.