TSK

TSK · अनु 32:23

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तर मी ही तुमच्याविरुध्द होईन आणि, मीच तुमच्या पापाबद्दल तुम्हास सातपट ताडण करीन.

या नियमशास्त्राच्या ग्रंथातील करारात लिहिलेला आहे. त्यातल्या सर्व शापाप्रमाणे परमेश्वर त्यांच्या वाइटासाठी त्यास इस्राएलाच्या सर्व वंशातून घालवून देईल.

जर मनुष्याने पश्चाताप केला नाही तर, देव त्याच्या तलवारीला धार लावणार आणि त्याचा धनुष्य युद्धासाठी तयार करणार.

पृथ्वीतील राहणाऱ्यांनो, भीती व खांच आणि पाश ही तुझ्यावर आहेत.

असे होईल की ते तुला विचारतील, ‘आम्ही कोठे जावे?’ तेव्हा तू त्यांना सांग, परमेश्वर असे म्हणतो: जे मरणासाठी निवडले आहे, ते मरणासाठी. जे तलवारीसाठी निवडलेले आहेत, ते तलवारीसाठी, जे उपासमारासाठी निवडले आहे; ते उपासमारीसाठी जावोत. आणि जे कैदेसाठी आहेत ते कैदेत जावोत.

तुमच्यात कडूपणाचे बाण पाठवेन, त्याचा अर्थ असा होईल मी तुमचा विध्वंस होईल, त्यांच्या वरचा दुष्काळ अजून कठोर करून तुमच्या भाकरीचा आधार काढून टाकेन;

कारण प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, मी निश्चित शिक्षा करण्यासाठी चार प्रकारच्या त्रासदायक गोष्टी पाठवणार आहे. दुष्काळ, तलवार, जंगली पशु, मरी ही माझी चार हत्यार यरूशलेमेच्या मनुष्य आणि प्राणी यांना नष्ट करेल, तेव्हा त्यांचा बचाव कसा होईल असे परमेश्वर देव म्हणतो.