मग चारशे तीस वर्षांच्या अखेरीस बरोबर त्याच दिवशी परमेश्वराच्या सर्व सेना मिसर देशातून बाहेर निघाल्या.
TSK
TSK · अनु 7:8
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
पुढील काळी तुमची मुलेबाळे विचारतील की हे काय? तेव्हा त्यांना सांग, ‘मिसर देशातून गुलामगिरीतून परमेश्वराने आम्हांला आपल्या हाताच्या बलाने बाहेर काढले.
तुझे सेवक अब्राहाम, इसहाक व इस्राएल, यांची आठवण कर; तू तुझ्या नावाने शपथ वाहिली होतीस; तू म्हणाला होतास, मी तुमची संतती आकाशातील ताऱ्यांइतकी जास्तीत जास्त करीन, मी ज्या देशाविषयी सांगितले तो सर्व देश मी तुझ्या संततीला देईन व तो सर्वकाळ त्यांचे वतन होईल.
पण तुम्हास परमेश्वराने मिसर देशाबाहेर आणले आणि तुम्हास स्वत:चे खास लोक केले. जणू लोखंड वितळविन्याच्या धधगत्या भट्टीतून त्याने तुम्हास बाहेर काढले आणि तुम्ही त्याच्या वतनाचे लोक आहा!
त्याचे तुमच्या पूर्वजांवर प्रेम होते. म्हणून त्याने तुमची निवड केली. त्यामुळेच त्याने तुम्हास आपल्या महान सामर्थ्याने मिसर देशातून बाहेर आणले. तो तुमच्या पाठीशी राहिला.
तुमचा देव परमेश्वर त्या राष्ट्रांना तुमच्यापुढून हुसकावून लावेल. पण आमच्या पुण्याईमुळेच परमेश्वराने हा प्रदेश आमच्या ताब्यात दिला असे मनात आणू नका. कारण ते खोटे आहे. परमेश्वराने त्यांना घालवले ते त्यांच्या दुष्टपणामुळे, तुमच्या सात्विकपणामुळे नव्हे.
तुम्ही जिवंत असेपर्यंत त्यांची शांती व भरभराट करायला बघू नका.
कारण आपल्या महान नावाकरता, परमेश्वर आपल्या लोकांस नाकारणार नाही, कारण तुम्हास आपले स्वत:चे लोक असे करणे परमेश्वरास आनंददायी वाटले.
परमेश्वर देव थोर आहे, तुझ्यावर प्रसन्न होऊन त्याने तुला इस्राएलाचा राजा केले आहे. परमेश्वर इस्राएलावर प्रेम करतो म्हणून, नियमशास्त्राचे व न्यायाचे पालन करण्यास त्याने तुला राजा केले आहे.”
कारण त्यांनी आपल्या तलवारीने देश मिळवला नाही. आणि त्यांच्या बाहूंनी त्यांना तारले नाही. परंतू तुझा उजवा हात, तुझा भुज, तुझ्या मुखाच्या प्रकाशाने त्यांना तारले, कारण तू त्यांच्यावर अनुकूल होतास.
तो आपला करार म्हणजे हजारो पिढ्यांसाठी आज्ञापिलेले आपले वचन सर्वकाळ आठवतो.
तू माझ्या दृष्टीने मोलवान आणि विशेष आहेस, मी तुझ्यावर प्रीती करतो; म्हणून मी तुझ्याबद्दल लोक आणि तुझ्या जिवाबद्दल दुसरे लोक देईन.
परमेश्वर पूर्वी मला दिसला व म्हणाला, हे इस्राएला, मी सार्वकालिक प्रीतीने, तुझ्यावर प्रीती केली आहे. म्हणून मी विश्वासाच्या कराराने तुला आपल्याजवळ ओढून घेतले आहे.
‹होय पित्या, तू हे केलेस, कारण खरोखर तुला हेच योग्य वाटले होते.›
आमच्या पूर्वजांवर दया दाखविण्यासाठी तो हे करणार आहे व आपल्या पवित्र कराराची आठवण ठेवणार आहे,
¶ प्रभूच्या प्रियजनांनो, तुम्हाविषयी आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे कारण पवित्र आत्म्याच्याद्वारे होणाऱ्या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हास प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे;
¶ जेव्हा देवाने अब्राहामाला वचन दिले, तेव्हा त्याच्यापेक्षा कोणी मोठा नसल्याने देवाने स्वतःच्याच नावाने शपथ वाहिली.