TSK

TSK · एस्ते 10:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

राजा यराबामाने आणखीही बऱ्याच गोष्टी केल्या; लढाया केल्या, लोकांवर तो राज्य करत राहिला. इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात, त्याने जे जे केले त्याची नोंद आहे.

मग या बातमीचा तपास करण्यात आला आणि खबर खरी असल्याचे आढळून आले आणि त्या दोघा पुरुषांना फाशी देण्यात आले आणि या सर्व गोष्टी राजासमक्ष राजांच्या इतिहासाच्या ग्रंथात नोंदवून ठेवण्यात आल्या.

राजाला आपली मुद्रा हामानाकडून परत मिळाली होती. ती आपल्या बोटातून काढून राजाने मर्दखयाला दिली. मग एस्तेरने मर्दखयाला हामानाच्या मालमत्तेचा प्रमुख नेमले.

मर्दखय राजवाड्यातील मोठा व्यक्ती असून त्याची किर्ती राज्यातील सर्वापर्यंत पोहचली होती, मर्दखयाचे सामर्थ्य उत्तरोत्तर वाढत गेले.

¶ नंतर राजाने दानीएलास मोठा सन्मान आणि अद्भुत भेटवस्तू दिल्या. त्यास अवघ्या बाबेलातील परगण्याची सत्ता दिली आणि दानीएल बाबेलाच्या सर्व ज्ञानी लोकांचा मुख्य प्रशासक झाला.