¶ बन्यामीन वंशातील एक पुरुष होता त्याचे नांव कीश; तो अबीएलाचा मुलगा, तो सरोराचा मुलगा, तो बखोराचा मुलगा, तो अफियाचा मुलगा होता. तो बन्यामिनी पुरुष मोठा पराक्रमी होता.
TSK
TSK · एस्ते 2:5
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
1 शमु 9:1
TSK
2 राजे 24:12
TSK
यहूदाचा राजा यहोयाखीन बाबेलच्या या राजाच्या भेटीला आला. यहोयाखीनाची आई, त्याचे कारभारी, वडिलधारी मंडळी, सरदार हेही लोक त्याच्याबरोबर होते. तेव्हा बाबेलच्या राजाने यहोयाखीनाला आपल्या ताब्यात घेतले. नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षी हे झाले.
एस्ते 1:2
TSK
असे झाले की, त्या दिवसात शूशन या राजवाड्यातील राजासनावर राजा अहश्वेरोश बसला होता.
एस्ते 3:2
TSK
राजाच्या आज्ञेनुसार राजद्वारावरील राजाचे सर्व सेवक हामानाला नमन व मुजरा करून मान देऊ लागले. पण मर्दखय त्यास नमन किंवा मुजरा करीत नसे.
एस्ते 10:3
TSK
¶ राजा अहश्वेरोशाच्या खालोखाल यहूदी मर्दखयाचे स्थान होते. त्याचे यहूदी बांधव त्यास फार मान देत. कारण लोकांच्या भल्यासाठी तो खूप मेहनत घेई. त्याच्या सर्व लोकांशी शांततेने बोलत असे.