कारण त्या वेळी परमेश्वर मिसरामधील प्रथम जन्मलेल्यांना ठार मारण्यासाठी फिरणार आहे; तो जेव्हा घराच्या दारावरील कपाळपट्टीवर व दाराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूला लावलेले रक्त पाहील तेव्हा तो ते दार ओलांडून जाईल; नाश करणाऱ्याला तुमच्या घरात जाऊ देणार नाही.
TSK
TSK · निर्ग 11:4
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
निर्ग 12:23
TSK
2 शमु 5:24
TSK
तुम्ही झाडावर चढून बसा. त्यांच्या सैन्याच्या चढाईचा आवाज तुम्हास झाडाच्या शेंड्यावरून ऐकू येईल. तेव्हा मात्र झटपट उठाव करा कारण परमेश्वरच पलिष्ट्यांच्या पाडावाला पुढे होईल.”
स्तोत्र 60:10
TSK
हे देवा, तू आम्हास नाकारले नाही? परंतु तू आमच्या सैन्याबरोबर लढाईत गेला नाहीस.
आमो 4:10
TSK
“मिसरला पाठविली होती, तशीच रोगराई मी तुमच्यावर पाठविली आहे. तुमचे तरुण मी तलवारीने मारले आहेत, आणि तुमचे घोडे पाडाव करून नेले आहेत, तुमच्या छावण्यांचा दुर्गंध तुमच्या नाकपुडयात येईल असे केले आहे. तरीसुध्दा तुम्ही माझ्याकडे फिरला नाही.” असे परमेश्वर म्हणतो.
मीखा 2:13
TSK
फोडणारा त्यांच्यापुढे जाईल व लोकांच्या पुढे चालेल. ते सुटून वेशीजवळ जाऊन तिच्यातून निघाले आहेत; आणि त्यांचा राजा त्यांच्यापुढे चालून गेला आहे. परमेश्वर त्यांचा पुढारी आहे.