तू आपल्या देवाची निंदा करू नको किंवा तुझ्या लोकांच्या राज्यकर्त्याला शाप देऊ नको.
TSK
TSK · निर्ग 13:12
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
प्रत्येक प्रथम जन्मलेला माझा आहे; तसेच तुझ्या गुरांढोरापैकी गायीचे व मेंढराचे प्रथम जन्मलेले नरवत्स माझे आहेत.
¶ लोकांस गुरेढोरे, शेरडेमेढंरे विशेष देणग्या म्हणून अर्पण करता येतील परंतु त्यापैकी प्रथम जन्मलेला नर परमेश्वराचा ठरलेला आहेच; त्याला, ते विशेष भेट म्हणून वाहू शकणार नाहीत.
“सर्व प्रथम जन्मलेले माझेच आहेत. मी मिसर देशात सर्व प्रथम जन्मलेल्यांना मारून टाकले. त्याच दिवशी इस्राएल लोकांतील पुरुषांपैकी व पशूपैकी प्रथम जन्मलेले सर्व मी आपणासाठी पवित्र ठरवले. ते माझेच आहेत. मी परमेश्वर आहे.”
स्त्रीचे पहिले मूल आणि जनावराचे पहिले पाडस परमेश्वरास अर्पण केलेच पाहिजे. ते मूल तुझे असेल. जन्माला आलेले पहिले पाडस जर अशुद्ध असेल तर ते परत मागे विकत घेतले पाहिजे. जर ते मूल असेल तर ते परत मागे विकत घेतले पाहिजे. ते मूल परत त्या कुटुंबाचे होईल.
आमचा प्रथम पुत्र आणि आमची गुरेढोरे, शेळया मेंढ्या यांचे प्रथम पिलू यांना आम्ही आमच्या देवाच्या मंदिरात सेवेला असलेल्या याजकांकडे आणू.
सर्वप्रथम फळांचा प्रथमभाग, समर्पित अंश म्हणून अर्पण करावयाची प्रत्येक वस्तू याजकाची व्हावी; तुम्ही मळलेल्या पिठाचा पहिला भाग याजकाचा असेल. अशासाठी की, तुझ्या घरात आशीर्वाद राहावा.