TSK

TSK · निर्ग 15:21

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

त्याने फारोचे रथ व स्वार यांना समुद्रात फेकून दिले; त्याचे निवडक अधिकारी तांबड्या समुद्रात बुडाले आहेत.

त्या स्त्रिया नाचत असता एकमेकीस उत्तर देऊन असे गात होत्या की, “शौलाने हजारास मारले आणि दावीदाने दहा हजारास मारले.”

अहो! वेशींनो, आपले मस्तक उंच करा. पुर्वकालीन द्वारांनो, उंच व्हा, म्हणजे गौरवशाली राजा आत येईल.

मला माझ्या प्रियासाठी गाणे गाऊ द्या, माझ्या प्रियाच्या द्राक्षमळ्याविषयीचे हे गीत आहे. माझ्या प्रियाचा द्राक्षमळा अतिशय सुपीक डोंगरावर आहे.

ते मोठ्याने ओरडून म्हणत होतेः राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून, तारण आहे.

¶ देवाचा दास मोशे ह्याचे गीत व कोकऱ्याचे गीत गात होते. सर्वसमर्थ देवा, परमेश्वरा, तुझ्या कृती महान आणि आश्चर्यकारक आहेत. हे प्रभू देवा, तू सर्वांवर राज्य करतो तुझे मार्ग योग्य आणि खरे आहेत.