TSK

TSK · निर्ग 20:5

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

परमेश्वर त्याच्यापुढून अशी घोषणा करीत गेला: “परमेश्वर, परमेश्वर, दयाळू, कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर,

तू तर कोणत्याही दुसऱ्या देवाला नमन करू नये; कारण ज्याचे नाव ईर्ष्यावान असे आहे; तो परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे.

¶ तुम्ही आपणासाठी मूर्ती करु नका, तसेच कोरीव मूर्ती किंवा स्तंभ आकृती कोरलेला पाषाण पूजा करण्यासाठी आपल्या देशात, उभारू नका कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.

तेव्हा उरलेले त्यांच्या शत्रूंच्या देशात आपल्या पापामुळे खंगत जातील आणि त्यांचे वाडवडील जसे त्यांच्या पापात खंगले त्याप्रमाणे ते आपल्या पापात खंगत जातील.

तुमची प्रेते या रानात नष्ट होईपर्यंत चाळीस वर्षे तुमची मुलेबाळे तुम्ही केलेल्या विश्वासघाताची शिक्षा भोगीत रानात भटकणारी होतील.

कारण मूर्तीपूजेचा त्यास तिटकारा आहे. परमेश्वर देव ईर्ष्यावान असून तो क्षणात भस्म करणारा अग्नी आहे.

कारण तुमच्यामध्ये असणारा तुमचा देव परमेश्वर ईर्ष्यावान आहे. त्याच्या लोकांनी इतर दैवतांची पूजा केलेली परमेश्वरास आवडत नाही. भलत्याच दैवतांची तुम्ही पूजा केल्यास त्याचा कोप होईल. त्या क्रोधाने तो तुम्हास पृथ्वीच्या पाठीवरुन नष्ट करील.

मूर्तीपूजा करून यांनी माझा कोप ओढवला. मूर्ती म्हणजे देव नव्हेत. क्षुल्लक मूर्ती करून त्यांनी मला क्रुद्ध केले. तेव्हा त्यांना मत्सर वाटेल असे मी करीन. जे एकसंध राष्ट्र नाही अशा लोकांमार्फत, मूढ राष्ट्राच्या योगे मी यांना इर्ष्येस पेटवीन.

तुमच्याजवळ जी राष्ट्रे उरलेली आहेत त्यांमध्ये तुम्ही जाऊ नका, आणि त्यांच्या देवांच्या नावांची आठवण करू नका, आणि त्यांची शपथ घालू नका; त्यांची सेवाही करू नका, आणि त्यांच्या पाया पडू नका.

परंतु यहोशवाने लोकांस सांगितले, “तुम्ही परमेश्वर देवाची सेवा करू शकणार नाही; कारण की तो पवित्र देव आहे. तो ईर्ष्यावान देव आहे; तो तुमच्या अधर्माची व तुमच्या पापांची क्षमा करणार नाही. त्याने तुमचे चांगले केले तो तुम्हाला भस्म करेल.

सैन्यांचा परमेश्वर असे म्हणतो, इस्राएल मिसरातून वर येत असता अमालेकाने त्यास काय केले, म्हणजे तो वाटेवर त्याच्याविरुध्द कसा उभा राहिला हे मी पाहिले आहे.

त्या शौलाच्या वंशातले सात मुले आमच्या हवाली कर. शौलाला परमेश्वराने राजा म्हणून निवडले होते. म्हणून शौलाच्या गिबा डोंगरावर त्याच्या मुलांना आम्ही देवासमक्षच फाशी देऊ.” राजा दावीद म्हणाला, “मला हे मान्य आहे. त्यांना मी तुमच्या हवाली करतो.”

परमेश्वराने मला एकागोष्टींची क्षमा करावी. अरामाचा राजा माझा स्वामी, रिम्मोनच्या दैवतांच्या पूजेला जातो तेव्हा मी त्यास नमन करीन तेव्हा परमेश्वराने आपल्या दासास क्षमा करावी.

परमेश्वराने इस्राएल लोकांशी करार करून त्यांना आज्ञा केली होती की, “इतर दैवतांचे भय तुम्ही धरू नका, आणि त्यांच्या पाया ही पडू नका व त्यांची सेवाही करू नका व त्यांना यज्ञ करू नका.

पण तरीही यहूदावरील परमेश्वराचा राग ओसरला नाही. मनश्शेच्या वर्तनाबद्दल अजूनही त्यास राग होता.

अदोम्यांचा पाडाव करून अमस्या आपल्या नगरात परतला. येताना त्याने सेईर येथील लोकांच्या देवाच्या मूर्ती बरोबर आणल्या आणि त्यांची पूजाअर्चा सुरू केली. या दैवतांना वंदन करून तो त्यांच्यापुढे धूप जाळू लागला.

पण तू म्हणतोस देव वडिलांच्या पापाबद्दल मुलाला शिक्षा करतो. तर त्याने त्यालाच प्रतिफळ द्यावे म्हणजेच त्यास त्याचा दोष कळेल.

आमच्याविरूद्ध आमच्या पूर्वजांची पापे आठवू नकोस. तुझी करुणा आमच्यावर लवकर होवो, कारण आम्हास तुझी नितांत गरज आहे.

परमेश्वरास त्याच्या पूर्वजांच्या पापांची आठवण राहो. त्याच्या आईची पापे कधीही विसरली न जावोत.

पण जो कोणी मला शोधण्यास अयशस्वी होतो, जिवाची हानी करून घेतो; जे सर्व कोणी माझा द्वेष करतात, त्यांना मरण प्रिय आहे.”

मग मनुष्य त्याचा उपयोग सरपणासाठी आणि स्वतःला गरम ठेवण्यासाठी करतो. होय! त्याने अग्नी पेटून आणि भाकर भाजण्यासाठी करतो. मग त्यांपासून देव बनवतो आणि त्याच्या पाया पडतो; तो त्यापासून मूर्ती करतो व त्याच्या पाया पडतो.

“पाहा, हे माझ्या समोर लिहीले आहे, मी गप्प बसणार नाही, पण त्यांना परत फेड करीन, त्यांचे अन्याय मी त्यांच्या पदरी भरून देईन.”

परमेश्वर, तू हजारोंना विश्वासाचा करार दाखवतो व मनुष्यांचे अन्याय त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांच्या पदरी ओततो. तू थोर व सामर्थ्यवान देव आहेस. सेनाधीश परमेश्वर तुझे नाव आहे.

“वडीलांनी आंबट द्राक्षे खाल्ली आणि मुलांचे दात आंबले,” याचा अर्थ काय आहे? इस्राएलाच्या भूमीत तू ज्या म्हणी वापरतो आणि म्हणतो.

पण जर नाही तर महाराज हे आपणास माहित असावे की, आम्ही तुमच्या देवाची उपासना करणार नाही, आणि त्याच्या पुढे आम्ही पालथे पडून त्यास दंडवत करणार नाही.”

आणि तो त्यांस म्हणाला, “जर तू मला नमन करशील व माझी उपासना करशील तर हे सर्व काही मी तुला देईन.”

‹जगाने तुमचा द्वेष करवा हे शक्य नाही; पण ते माझा द्वेष करते, कारण मी त्याच्याविषयी साक्ष देतो की, त्यांची कामे वाईट आहेत.›

‹जो माझा द्वेष करतो तो माझ्या पित्याचाही द्वेष करतो.›

कारण देहस्वभावाचे चिंतन हे देवाशी वैर आहे; कारण ते देवाच्या नियमाला अंकित होत नाही आणि त्यास खरोखर, होता येत नाही.

हे देवाशी अप्रामाणिक पिढी! जगाशी मैत्री म्हणजे देवाशी वैर हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून जो कोणी जगाचा मित्र होऊ इच्छितो तो देवाचा वैरी आहे.