आणि सर्व लोक मिळून म्हणाले, “परमेश्वराने सांगितलेले सर्व आम्ही करू.” मोशेने परमेश्वरास लोकांचे म्हणणे सांगितले.
TSK
TSK · निर्ग 24:3
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
मग मोशेने कराराचे पुस्तक घेऊन लोकांस वाचून दाखविले आणि ते ऐकून लोक म्हणाले, “परमेश्वराने सांगितले आहे तसे आम्ही करू आणि त्याने दिलेल्या आज्ञा आम्ही पाळू.”
पाहा माझा देव परमेश्वर याने आज्ञा दिली त्याप्रमाणे विधी आणि नियम मी तुम्हास शिकवले. तुम्ही जो देश ताब्यात घेण्यास जात आहात तेथे तुम्ही ते पाळावे म्हणून मी ते सांगितले.
¶ मोशेने सर्व इस्राएल लोकांस एकत्र बोलवून सांगितले, “इस्राएल लोकहो, आज मी जे विधी आणि नियम सांगतो ते ऐका. तुम्ही ते शिका आणि त्यांचे काटेकोरपणे पालन करा.
पण मोशे तू इथेच थांब. त्यांना द्यायच्या सर्व आज्ञा, विधी नियम मी तुला सांगतो. त्यांना मी जो देश वतन म्हणून देत आहे तेथे त्यांनी ते पाळावे.”
¶ म्हणून तुमचा देव परमेश्वर ह्यांच्यावर प्रेम करा. त्याच्या आज्ञेप्रमाणे वागा. त्याने घालून दिलेल्या नियमांचे, आज्ञांचे पालन करा.
तेव्हा यहोशवा लोकांस म्हणाला, “तुम्ही आपल्या स्वतःचे साक्षी आहात, तुम्ही परमेश्वराची सेवा करण्यास त्यास आपल्यासाठी निवडून घेतले आहे.” ते म्हणाले, “आम्ही साक्षी आहोत.”
मनोभावे शपथ घेतल्यामुळे सर्व यहूदा लोकांस मनापासून आनंद झाला. एकचित्ताने ते परमेश्वरास शरण गेले. त्यांनी देवाचा शोध घेतला असता तो त्यांना सापडला होता. परमेश्वराने त्यांना चहूबाजूनी स्वास्थ्य दिले.
तुम्ही जेव्हा मिसरातून बाहेर आला तेव्हा जे वचन बोलून मी तुमच्याबरोबर करार स्थापित केला, त्याप्रमाणे मी तुम्हासोबत आहे आणि माझा आत्मा तुमच्यात राहत आहे, घाबरू नका!