TSK

TSK · निर्ग 29:28

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

नंतर अहरोन व त्याचे पुत्र यांच्या संस्कारासाठी वधिलेल्या मेंढ्यांचे ओवाळलेले ऊर व समर्पिलेली मांडी तू पवित्र करावी.

¶ परमेश्वरासाठी कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याचा विधी असा:

ओवाळणीचा ऊर व समर्पणाची मांडी ही चरबीच्या हव्याबरोबर ओवाळणीचे अर्पण म्हणून लोकांनी परमेश्वरासमोर ओवाळण्यासाठी आणावी; ओवाळून झाल्यावर परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे हा भाग तुझा व तुझ्या मुलाबाळांचा कायमच्या हक्काचा आहे.”

प्रत्येक मनुष्याने पवित्र केलेल्या वस्तू त्या याजकाच्याच होत. याजकाला कोणी काही दिले तर ते त्याचेच होईल.”

जेव्हा तुम्ही तेथे पिकणारे अन्न खाल तेव्हा त्यातला काही भाग समर्पण म्हणून परमेश्वरास अर्पण करा.

¶ नंतर परमेश्वर अहरोनास म्हणाला, पाहा मला केलेली समर्पणे इस्राएलाच्या ज्या पवित्र भेटी मला देतात त्या सर्व मी तुला दिल्या आहेत. तू आणि तुझी मुले त्या वाटून घेऊ शकता. तो नेहमीच तुमचा हक्क होय.

इस्राएलचे लोक जेव्हा त्यांच्याकडे असलेल्या गोष्टीतील दहावा भाग तुला देतील तेव्हा तू त्यातला सर्वात चांगला आणि पवित्र भाग निवडायला पाहिजेस आणि तो दहावा भाग तू परमेश्वरास अर्पण केला पाहिजेस.

त्यांच्या हिश्श्यातून घेऊन तो परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पित अंश म्हणून याजक एलाजाराला द्यावा.

यज्ञासाठी गोऱ्हा किंवा मेंढरू मारताना त्या जनावराचा खांद्याचा भाग, गालफडे व कोथळा याजकाला द्यावा.