TSK

TSK · निर्ग 33:11

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तेव्हा मोशे यहोशवाला म्हणाला, “काही लोकांस निवड व त्यांना घेऊन उद्या अमालेकांशी लढाई कर; देवाने मला दिलेली काठी हातात घेऊन मी डोंगराच्या माथ्यावर उभा राहीन.”

यहोशवाने लोकांचा गोंगाट ऐकला व तो मोशेला म्हणाला, “छावणीत लढाईसारखा आवाज ऐकू येत आहे.”

माझा सेवक मोशे तसा नाही.” तो माझ्या सर्व घराण्यात विश्वासू आहे.

त्या पर्वतावर प्रत्यक्ष आपल्यासमोर उभे राहून, अग्नीतून परमेश्वराने आपल्याशी तोंडोतोंड भाषण केले.

इस्राएलात मोशे सारखा दुसरा संदेष्टा आजपर्यंत झाला नाही. परमेश्वरास मोशेचा प्रत्यक्ष परिचय होता.

जशी एखादी व्यक्ती आपल्या मित्रासाठी वादविवाद करते तसा तो माझ्याविषयी देवाबरोबर बोलतो.

ज्याला वधू आहे तो वर आणि जो वराचा मित्र उभा राहून त्याचे बोलणे ऐकतो, त्यास वराच्या वाणीने अत्यानंद होतो. तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे.

‹मी तुम्हास जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात.›