निर्ग 27:1
TSK
¶ परमेश्वर मोशेला म्हणाला, बाभळीच्या लाकडाची पाच हात लांब, पाच हात रुंद व तीन हात उंच अशी चौरस वेदी तयार कर.
TSK
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
¶ परमेश्वर मोशेला म्हणाला, बाभळीच्या लाकडाची पाच हात लांब, पाच हात रुंद व तीन हात उंच अशी चौरस वेदी तयार कर.
त्याने पवित्र निवासमंडपाच्या दर्शनमंडपाच्या दारापाशी होमवेदी ठेवली व तिच्यावर होमार्पणे व अन्नार्पणे अर्पण केली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
त्याने हे सर्व देवाच्या गौरवी कृपेची स्तुती व्हावी म्हणून केले. ही कृपा त्याने त्याच्या प्रिय पुत्राद्वारे आम्हास भरपूर केली.
तो केवळ आमच्याच पापासाठी नव्हे तर सगळ्या जगाच्याही पापांबद्दल प्रायश्चित्त झाला आहे.