TSK

TSK · निर्ग 7:19

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

ही दोन्ही चिन्हे दाखवल्यावरही त्यांनी जर तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, तर मग नदीचे थोडे पाणी घे आणि ते कोरड्या जमिनीवर ओत; म्हणजे तू नदीतून घेतलेल्या पाण्याचे कोरड्या भूमीवर रक्त होईल.”

¶ मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाला त्याची काठी जमिनीवरील धुळीवर मारण्यास सांग म्हणजे मग अवघ्या मिसर देशभर धुळीच्या उवा बनतील.”

मोशे फारोपुढून निघून नगराबाहेर गेला. त्याने परमेश्वराकडे हात पसरून प्रार्थना केली, आणि मेघगर्जना व गारांचा वर्षाव थांबला आणि पृथ्वीवर पाऊस पडणे बंद झाले.

¶ मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आपला हात आकाशात उंच कर म्हणजे अवघा मिसर देश अंधारात गडप होईल तो अंधार इतका दाट असेल की तुम्हास चाचपडत जावे लागेल.”

¶ नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा हात समुद्रावर उगार म्हणजे भिंतीसारखे उभे राहिलेले पाणी पूर्ववत जमून मिसऱ्यावर, त्यांच्या रथावर व स्वारांवर येईल.”