परमेश्वर मोशेला म्हणाला, तू मिसरात परत जाशील तेव्हा पाहा, जे सर्व चमत्कार मी तुझ्या हाती ठेवले आहे ते तू फारोपुढे करून दाखव. तथापि मी त्याचे मन कठीण करीन, आणि तो लोकांस जाऊ देणार नाही.
TSK
TSK · निर्ग 8:32
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
निर्ग 4:21
TSK
निर्ग 8:8
TSK
मग फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले. फारो त्यांना म्हणाला, “हे बेडूक माझ्यापासून, व माझ्या लोकांपासून दूर करण्याकरिता तुमच्या परमेश्वरास विनंती करा. मग तुमच्या परमेश्वराची उपासना करण्याकरिता मी तुम्हा लोकांस जाऊ देईन.”
निर्ग 9:7
TSK
फारोने बारकाईने चौकशी केली आणि पाहा, इस्राएल लोकांच्या जनावरांपैकी एकही मरण पावले नव्हते. तरीपण फारोचे मन कठीणच राहिले. त्याने इस्राएल लोकांस जाऊ दिले नाही.
प्रेषि 28:26
TSK
¶ या लोकांकडे तुम्ही जा आणि त्यांना सांगाः तुम्ही ऐकाल तर खरेपण तुम्हास समजणार नाही, तुम्ही पहाल तुम्हास दिसेल पण तुम्ही काय पाहत ते तुम्हास कळणार नाही.
याको 1:13
TSK
¶ कोणाची परिक्षा होत असता, तेव्हा त्याने असे म्हणू नये की “देवाने मला मोहात घातले.” कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह पडणार नाही आणि तो कोणालाही मोहात पाडत नाही.