मग अदोमाचे अधिकारी हैराण झाले. मवाबाचे नायक भीतीने थरथर कापत आहेत आणि कनानी लोक गलित झाले आहेत.
TSK
TSK · यहे 21:7
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
त्या लेवी अधिकाऱ्यांनी पुढे हेही सांगावे की “भीत्रा व घाबरलेल्या मनाचा कोणी असल्यास त्याने घरी परत जावे. नाहीतर त्याच्यामुळे इतरांचेही हृदयाचे अवसान गळेल.”
¶ इस्राएल लोक यार्देनेपलीकडे जाईपर्यंत परमेश्वराने तिचे पाणी त्यांच्यासाठी कसे आटविले हे यार्देनेपलीकडील अमोऱ्यांच्या सर्व राजांनी व समुद्रकिनाऱ्याच्या सर्व कनानी राजांनी ऐकले, तेव्हा इस्राएल लोकांच्या भीतीने त्यांच्या काळजाचे पाणी-पाणी झाले आणि ते गलितगात्र झाले.
तेव्हा इस्राएलाचा परमेश्वर म्हणतो, ‘यरूशलेम आणि यहूदा यांना मी आता अशा संकटाच्या खाईत लोटीन की ते ऐकूनच लोकांस धक्का बसेल.
दावीदाच्या घराण्याला कळविण्यात आले की, अराम आणि एफ्राईम हे एक झाले आहेत. तेव्हा रानातील वृक्ष वाऱ्याने कापतात तसे आहाज आणि त्याच्या लोकांची मने भीतीने कंपीत झाली.
जेव्हा तो पार जाईल तेव्हा तो तुला झाकून टाकेल. आणि रोज रोज सकाळी, दिवसा आणि रात्री तो पार जाईल. आणि जेव्हा संदेश कळेल, तर ते भयच असे होईल.
परमेश्वर पुढे असे म्हणतो: “उत्तरेकडून लोक येत आहे. पृथ्वीवरच्या अतीदूरच्या ठिकाणाहून मोठे राष्ट्र येत आहे.
मग यिर्मया यहूदाच्या अधिकाऱ्यांशी व इतर लोकांशी बोलला तो म्हणाला, “जी वचने तुम्ही ऐकली, ती या नगरीबद्दल व या मंदिराबद्दल हे भविष्य म्हणून सांगण्यासाठी परमेश्वरानेच मला पाठवले.
बाबेलाच्या राजाने त्यांचे वर्तमान ऐकले आहे आणि त्याचे हात विपत्तीने गळाले आहेत. प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे त्यास वेदनेने वेढले आहे.”
मानवाच्या मुला, आपले मुख इस्राएलाच्या पर्वताच्या विरुध्द राहून त्यांच्या विरुध्द भाकीत कर
प्रत्येक हात अडखळतील आणि प्रत्येक गुडघा पाण्याप्रमाणे कमजोर होईल.
“मानवाच्या मुला, हे इस्राएलाच्या घराण्या तू काय करतोस, बंडखोर पणा तू केला नाहीस काय?”
मग मी त्यांना म्हणेन, आहा, हे परमेश्वर देव मला म्हणाला, हा केवळ दाखला सांगणारा आहे का?
निनवे रिकामी आणि ओसाड झाली आहे. तिच्या हृदयाचे पाणी झाले आहे, पाय लटपटत आहेत, आणि प्रत्येकजण यातनेत आहे; त्यांचे चेहेरे पांढरेफटक पडले आहेत.
¶ म्हणून तुमचे लोंबकळत असलेले हात उंच करा आणि तुमचे लटपटणारे गुडघे बळकट करा!