TSK

TSK · उत्प 1:14

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

मी ढगात मेघधनुष्य ठेवले आहे; ते सर्व पृथ्वी व माझ्यामध्ये केलेल्या कराराची निशाणी आहे.

त्या दिवसाच्या पहाटेचे तारे काळे होत. तो दिवस प्रकाशाची वाट पाहो पण तो कधी न मिळो, त्याच्या पापण्यास उषःकालाचे दर्शन न घडो.

पाहा, त्याच्या दृष्टीने चंद्र सुध्दा तेजोमय नाही. त्याच्या दृष्टीला तारे देखील पवित्र वाटत नाहीत.

तू कृत्तिकांना बांधून ठेवू शकशील का? तुला मृगशीर्षाचे बंध सोडता येतील का?

तेव्हा मनुष्य काय आहे की तू त्याची आठवण करावी? किंवा मनुष्यसंतान काय आहे की तू त्यांच्याकडे आपले लक्ष लावावे?

दिवस तुझा आहे आणि रात्रही तुझीच आहे; तू सूर्य आणि चंद्र त्यांच्या जागी ठेवले.

त्याने ऋतुमान समजण्यासाठी चंद्र नेमला आहे; सूर्याला त्याची मावळण्याची वेळ कळते.

ज्याने मोठा प्रकाश निर्माण केला, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.

त्याने ती सर्वकाळासाठी व कायम स्थापली; त्याने नियम ठरवून दिला तो कधीही बदलणार नाही.

परमेश्वर असे म्हणतो, “देशांचे मार्ग शिकू नका. आणि आकाशातील चिंन्हाना घाबरुन जाऊ नका, कारण त्यामुळे राष्ट्रे भयभीत असतात.

परमेश्वर असे म्हणतो, “जर तू दिवस आणि रात्र या विषयीचा जो माझा करार तुमच्याने मोडवेल यासाठी की, दिवस आणि रात्र आपापल्या योग्यवेळी होऊ नयेत म्हणून,

मग जेव्हा मी तुझा दिवा विझवून टाकीन तेव्हा मी आकाश झाकीन व त्यातले तारे अंधारमय करीन. मी सूर्याला ढगाने झाकीन आणि चंद्र प्रकाशणार नाही.

नवचंद्रदिनी त्याने एक निर्दोष गोऱ्हा, सहा निर्दोष कोकरे व एक निर्दोष मेंढा अर्पण करावा.

मी आकाशात आणि पृथ्वीवर आश्चर्यकारक चिन्हे आणि तेथे रक्त, अग्नी व दाट धुराचे खांब दाखवीन.

ते तुम्ही, ज्याने कृत्तिका व मृगशीर्ष ही नक्षत्रे बनवली, तोच दिवसाचे परिवर्तन काळोख्या रात्रीत करतो; आणि दिवसास रात्रीने अंधकारमय करतो; समुद्रातील पाण्याला बोलावून पृथ्वीच्या पाठीवर ओततो, त्याचे नाव “परमेश्वर” आहे.

“यहूद्यांचा राजा जन्मला आहे तो कोठे आहे? आम्ही पूर्वेला त्याचा तारा पाहीला आणि त्यास नमन करावयास आलो आहोत.”

¶ ‹सांभाळत्या दिवसातल्या छळानंतर लगेच असे घडेल; सूर्य अंधकारमय होईल व चंद्र प्रकाश देणार नाही, आकाशातील तारे गळून पडतील, आकाशातील सर्व बळे डळमळतील, आकाश गुंडाळीसारखे गुंडाळले जाईल.›

¶ ‹सूर्य, चंद्र, तारे यांच्यात चिन्हे होतील, पृथ्वीवरील राष्ट्रे हतबल होतील व समुद्राच्या गर्जणाऱ्या लाटांनी ते घाबरुन जातील.›

आणि वर आकाशात अद्भूते व खाली पृथ्वीवर चिन्हे, म्हणजे रक्त, अग्नी व धूम्ररूप वाफ अशी मी दाखवीन.

¶ चौथ्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा सूर्याचा तिसरा भाग, चंद्राचा तिसरा भाग व ताऱ्यांचा तिसरा हिस्सा मारला गेला; त्यांचा तिसरा भाग अंधकारमय झाला आणि दिवसाचा व रात्रीचाही तिसरा भाग प्रकाशित झाला नाही.