चला आपण खाली जाऊन त्यांच्या भाषेचा घोटाळा करून टाकू. मग त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाही.”
TSK
TSK · उत्प 11:3
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
अशाप्रकारे त्यांनी इस्राएल लोकांचे जीवन फारच कठीण काबाडकष्टांचे व हाल अपेष्टांचे केले; त्यांनी त्यांना विटा बनविण्याची, बांधकामासाठी चुना बनविण्याची तसेच शेतीची व इतर अतिशय कठीण व कष्टाची कामे बळजबरीने करायला लावली.
तो त्यांना म्हणाला, “तुम्ही लोकांस विटा बनवण्याकरिता आजपर्यंत सतत गवत दिलेले आहे. परंतु आता त्यांना लागणारे गवत त्यांना स्वत: शोधून आणायला सांगा.
ते आपणाला वाईट योजनेत उत्त्तेजन देतात; ते खाजगीत एकत्रित येऊन सापळा रचण्याचा सल्लामसलत करतात; ते म्हणतात, आपल्याला कोण पाहील?
¶ मी आपल्या मनात म्हटले, “आता ये, मी आनंदाद्वारे तुझी पारख करतो. म्हणून आनंदाचा उपभोग घे पण पाहा, हे सुद्धा केवळ तात्पुरत्या हवेच्या झुळकेसारखे आहे.”
“विटा पडल्या आहेत, पण आम्ही तासलेल्या दगडांनी पुनः बांधु; उंबराची झाडे तोडून टाकली आहेत, पण आम्ही त्यांच्या जागी गंधसरू लावू.”
ते असे लोक आहेत जे सतत माझे मन दुखवतात, ते बागेत यज्ञ करतात आणि विटांवर धूप जाळतात.
¶ जोपर्यंत, “आज” म्हटलेला काळ आहे तोपर्यंत, प्रत्येक दिवशी एकमेकांना उत्तेजन द्या, यासाठी की तुमच्यापैकी कोणाचीही पापामुळे फसगत होऊन तुमची अंतःकरणे कठीण होऊ नयेत.
¶ अहो! तुम्ही जे म्हणता की, “आज किंवा उद्या आपण या गावाला जाऊ, तेथे वर्षभर राहू आणि व्यापार करून कमावू.”