TSK

TSK · उत्प 12:11

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तेव्हा मानवजातीच्या मुली आकर्षक आहेत असे देवपुत्रांनी पाहिले, त्यांच्यापैकी त्यांना ज्या आवडल्या त्या त्यांनी स्त्रिया करून घेतल्या.

देवाने मला माझ्या बापाचे घर सोडून देऊन जागोजागी प्रवास करायला लावले, तेव्हा मी तिला म्हणालो, तू माझी पत्नी म्हणून मला एवढा विश्वासूपणा दाखव; जेथे जेथे आपण जाऊ तेथे तेथे माझ्याविषयी हा, ‘माझा भाऊ आहे असे सांग.’”

जेव्हा तेथील लोकांनी त्याच्या पत्नीविषयी त्यास विचारले, तेव्हा तो म्हणाला, “ती माझी बहीण आहे.” “ती माझी पत्नी आहे,” असे म्हणण्यास तो घाबरला. कारण त्याने विचार केला की, “रिबकेला मिळविण्यासाठी या ठिकाणचे लोक माझा घात करतील, कारण ती दिसायला इतकी सुंदर आहे.”

पोटीफराने आपल्या घरादाराचा सर्व कारभार योसेफाच्या हवाली केला. तो जे अन्न खात असे, त्या पलीकडे कशाचाही तो विचार करत नव्हता. योसेफ फार देखणा व आकर्षक होता.

संध्याकाळी तो आपल्या पलगांवरून उठला, आणि राजमहालाच्या छतावरून फिरु लागला. तिथून त्यास एक स्त्री स्नान करताना दिसली. ती अतिशय रुपवान होती.

परमेश्वराविरूद्ध शहाणपण, बुद्धि किंवा युक्ती ही मुळीच उभी राहू शकत नाहीत.

माझा प्रियकर एन-गेदीमधील द्राक्षाच्या मळ्याजवळील मेंदीच्या फुलांच्या गुच्छासारखा आहे.