TSK

TSK · उत्प 18:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ नंतर ते पुरुष उठले व सदोम नगराकडे जाण्यास निघाले. अब्राहाम त्यांना वाटेस लावण्यासाठी त्यांच्या बरोबर गेला.

¶ संध्याकाळी ते दोन देवदूत सदोमास आले, त्या वेळी लोट सदोमाच्या वेशीजवळ बसला होता. लोटाने त्यांना पाहिले, तो त्यांना भेटण्यास उठला, आणि त्याने भूमीपर्यंत तोंड लववून त्यांना नमन केले.

मग अब्राहामाने देशातील लोकांसमोर स्वतः वाकून नमन केले.

याकोब स्वतः पुढे गेला. आपल्या भावापर्यंत पोहचेपर्यंत त्याने सात वेळा भूमीपर्यंत लवून त्यास नमन केले.

योसेफ घरी आला तेव्हा त्या भावांनी त्याच्यासाठी आपल्यासोबत आणलेली भेट त्याच्या हातात दिली व त्यांनी त्यास भूमीपर्यंत खाली वाकून नमन केले.

यहूदा व त्याचे भाऊ परत योसेफाच्या घरी गेले. योसेफ अजून घरातच होता. त्या भावांनी योसेफापुढे लोटांगण घातले.

¶ यहोशवाने यरीहोजवळ असताना समोर पहिले तो कोणी पुरुष आपल्या हाती उपसलेली तलवार घेऊन पुढे उभा आहे असे त्याच्या नजरेस पडले. यहोशवाने जवळ जाऊन विचारले, तू आमच्या पक्षाचा की आमच्या वैऱ्यांच्या पक्षाचा?

तेव्हा त्या स्त्रीने जाऊन आपल्या पतीला असे सांगितले की, “देवाचा मनुष्य माझ्याजवळ आला, आणि त्याचे रूप देवाच्या दूताच्या रूपासारखे फार भयंकर होते. म्हणून, तो कोठला, हे मी त्यास विचारले नाही, आणि त्याने आपले नाव मला सांगितले नाही.

¶ तेव्हा यरीहो येथील संदेष्ट्यांचे पुत्र जे समोर होते ते त्यास पाहून म्हणाले, “एलीयाचा आत्मा अलीशावर आला आहे.” आणि ते त्यास भेटायला आले. त्यांनी त्यास जमिनीपर्यंत लवून नमन केले.

लोकांचा पाहुणचार करण्याचे विसरू नका. असे करण्याने काहींनी त्यांच्या नकळत देवदूतांचे स्वागत केले आहे.