TSK

TSK · उत्प 18:25

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

पण मोशे आणि अहरोन जमिनीवर पालथे पडले आणि ओरडले, हे देवा सर्व देहधारी आत्म्यांच्या, देवा! फक्त एका मनुष्याने पाप केले आहे! म्हणून सर्व मंडळीवर रागावू नकोस.

अरण्यातील वृक्ष परमेश्वरासमोर हर्षभरित होऊन गातील कारण साक्षात तोच पृथ्वीचा न्याय करायला आला आहे.

देव नेहमीच न्यायी असतो का? सर्वशक्तिमान देव बरोबर असलेल्या धार्मिक गोष्टी कधीच बदलत नाही काय?

मी स्वत:शीच म्हणतो: सगळ्याच्याच बाबतीत हे घडते. पापी लोकांसारखेच निष्पाप लोकही मरतात. देवच सगळ्यांचे जीवन संपवतो.

खरोखर, हे देव कधीच वाईट करीत नाही, तो सर्वशक्तिमान कधीच न्यायाला विरोध करीत नाही.

जर मनुष्याने पश्चाताप केला नाही तर, देव त्याच्या तलवारीला धार लावणार आणि त्याचा धनुष्य युद्धासाठी तयार करणार.

आकाश त्याच्या चांगुलपणाविषयी सांगत असते. कारण देव स्वतः न्यायधीश आहे.

जरी पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व राहणारे सर्व भितीने कापत आहेत, मी पृथ्वीचे खांब स्थिर करीन.

परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यास येत आहे; तो न्यायीपणाने जगाचा आणि सरळपणाने राष्ट्रांचा न्याय करील.

¶ पापी शंभर दुष्कृत्य करेल आणि तरीही तो भरपूर आयुष्य जगला. असे असले तरी मला माहित आहे जे देवाचा सन्मान करतात, जे त्याच्यासमक्ष त्यास मान देतात हे अधिक चांगले आहे.

धार्मिक नाश पावतो, पण कोणीच हे विचारात घेत नाही. आणि कराराचे विश्वासू लोक एकत्र जमले, पण कोणासही हे समजले नाही की, धार्मिक दुष्टांमुळे एकत्र झाला आहे.

तुम्ही माझ्याकडे परत याल. मग दुष्ट मनुष्य आणि चांगला मनुष्य यातील फरक तुम्हास कळेल. देवाला अनुसरणारा व न अनुसणारा यातील फरक तुम्हास समजेल.”

¶ पण आमची अनीती जर देवाचे न्यायीपण स्थापित करते तर आम्ही काय म्हणावे? जो देव आमच्यावर आपला क्रोध आणतो तो अन्यायी आहे काय? (मी मानवी व्यवहाराप्रमाणे बोलत आहे.)