परमेश्वर त्याच्यापुढून अशी घोषणा करीत गेला: “परमेश्वर, परमेश्वर, दयाळू, कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर,
TSK
TSK · उत्प 19:16
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
आपला देव परमेश्वर दयाळू आहे. तो तुम्हास अंतर देणार नाही. तो तुमचा सर्वनाश होऊ देणार नाही. तो तुमच्या पूर्वजांशी त्याने शपथपूर्वक केलेला करार तो विसरणार नाही.
परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे. कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.
हे प्रभू, तू उत्तम आहेस आणि क्षमा करण्यास तयार आहेस, आणि जे सर्व तुला हाक मारतात त्यांना तू महान दया दाखवतोस.
परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे; तो सहनशील आहे; त्याच्यामध्ये महान कराराची विश्वासयोग्यता आहे.
परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वर चांगला आहे म्हणून त्यास धन्यवाद द्या. कारण त्याची कराराची विश्वसनीयता सर्वकाळ टिकून राहते.
परमेश्वरास धन्यावाद द्या. कारण तो चांगला आहे. आणि त्याची कराराची विश्वसनियता सर्वकाळ टिकणारी आहे.
परमेश्वरास धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.
परमेश्वराची उपकारस्तुती करा; कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
ही परमेश्वराची प्रेमदया आहे की आम्ही नाश नाही झालो. त्याची करुणा कधी न संपणारी आहे.
‹परंतु तुम्ही आपल्या शत्रूंवर प्रीती करा व त्यांचे बरे करा आणि निराश न होता उसने द्या म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल व तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल कारण तो अनुपकारी व वाईट यांच्यावर तो दया करणारा आहे.›
‹ज्याने मला पाठवले आहे त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. त्यास शेवटल्या दिवशी मी उठवीन.›
म्हणजे परमेश्वराची इच्छा असेल त्याच्यावर तो दया करतो आणि त्याची इच्छा असेल त्यास तो कठिण करतो.
पण देव खूप दयाळू आहे कारण त्याच्या महान प्रीतीने त्याने आमच्यावर प्रेम केले.
तर जे धार्मिकांना त्यांच्या परीक्षेतून कसे सोडवावे व जे अनीतिमान लोकांस शिक्षा भोगत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून, ठेवावे हे प्रभूला कळते.