TSK

TSK · उत्प 23:20

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

इसहाक व इश्माएल या त्याच्या मुलांनी त्यास सोहर हित्ती याचा मुलगा एफ्रोन याचे शेत मम्रेसमोर आहे त्यातल्या मकपेला गुहेत पुरले.

¶ मग त्याने त्यांना आज्ञा दिली आणि त्यांना म्हणाला, “मी आता माझ्या लोकांकडे जात आहे. एफ्रोन हित्ती ह्याच्या शेतातील गुहेत माझ्या पूर्वजांबरोबर मला पुरावे,

‘माझा बाप मरावयास टेकला असताना त्याने मला शपथ घेण्यास सांगून म्हटले, “पाहा, मी मरणार आहे. माझी जी कबर मी आपणासाठी कनान देशात खणून ठेवली आहे तिच्यात तू मला नेऊन पूर.” तेव्हा कृपा करून माझ्या पित्यास पुरावयास जाऊ द्या; मग मी परत येईन.

योसेफाचे मरण जवळ आले तेव्हा तो आपल्या भावांना म्हणाला, “माझी मरण्याची वेळ जवळ आली आहे; परंतु देव तुमची काळजी घेईल हे मला माहीत आहे. तो देव तुम्हास या देशातून काढून अब्राहाम, इसहाक, व याकोब यांना जो देश देण्याचे वचन त्याने दिले होते त्या देशात घेऊन जाईल.”

पण राजा अरवनाला म्हणाला नाही, “तुला मी खरे सांगतो, मी ही जमीन विकतच घेणार आहे फुकटात मिळालेले मी होमबली म्हणून परमेश्वर देवाला अर्पण करणार नाही.” तेव्हा दावीदाने खळे आणि बैल पन्नास शेकेल चांदी देऊन विकत घेतले.

¶ नंतर मी खरेदीखतावर सही केली आणि मोहोरबंद केले आणि ते साक्षीला साक्षीदार ठेवले. मग मी तागडीने रुपे मोजले.