मग त्याचा बाप इसहाकाने उत्तर दिले आणि त्यास म्हणाला, “पाहा, जेथे पृथ्वीवरील समृद्धी व आकाशातले दंव पडते त्या ठिकाणापासून दूर तुझी वस्ती होईल.
TSK
TSK · उत्प 27:28
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
आशेराचे अन्न समृद्ध होईल आणि तो राजाला योग्य असे शाही अन्नपदार्थ पुरवील.
आणि मी तुला सर्वात चांगले जैतूनाचे तेल. नवीन द्राक्षरस आणि धान्य देत आहे. या गोष्टी इस्राएलचे लोक मला परमेश्वरास देतात. कापणीच्या वेळी या गोष्टी ते प्रथम गोळा करतात.
तुमचा देव परमेश्वर तुम्हास उत्तम देशात घेऊन जात आहे. ती भूमी सुजला, सुफला आहे. तेथे डोंगरात उगम पावून जमिनीवर वाहणारे नद्या-नाले आहेत.
पर्जन्याप्रमाणे माझ्या बोधाचा वर्षाव माझे भाषण दहीवराप्रमाणे ठिबको. तो बोध असेल जमिनीवरुन खळखळणाऱ्या पाण्यासारखा. हिरवळीवर रिझमझिमणाऱ्या पावसासारखा. झाडाझुडुपांवर पडणाऱ्या पावसाच्या सरीसारखा.
म्हणून इस्राएल सुरक्षित राहील. याकोबाची विहीर त्यांच्या मालकीची आहे. धान्याने व द्राक्षरसाने संपन्न अशी भूमी त्यांना मिळेल. त्या प्रदेशावर भरपूर पाऊस पडेल.
गिलबोवाच्या डोंगरावर पाऊस किंवा दव न पडो! तिथल्या शेतातून अर्पण करण्यापुरतेही काही न उगवो! कारण शूरांच्या ढालींना तिथे गंज चढला. शौलाची ढाल तेल-पाण्यावाचून तशीच पडली.
¶ गिलाद येथील तिश्बी येथे उपरी म्हणून राहणाऱ्यापैकी एलीया हा एक संदेष्टा होता. एलीया अहाब राजाला म्हणाला, “मी इस्राएलाच्या परमेश्वर देवाचा सेवक आहे. त्याच्या जीविताची शप्पथ घेवून मी हे सांगतो की, येती काही वर्षे पाऊसच काय दंवसुध्दा पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल.”
ते तुझ्या घरातल्या समृद्धीमुळे तृप्त होतील. तू आपल्या बहुमोल नदीतून त्यांना मनसोक्त पिण्यास देशील.
तो मनुष्यास आनंदित करणारा द्राक्षरस, त्याचा चेहरा चमकविणारे तेल, आणि त्याचे जीवन जिवंत ठेवणारे अन्नही त्याने उत्पन्न करावी.
हे आकाशा, वरून खाली पाऊस पाड! ढग सात्विक तारणाचा पाऊस खाली पाडो. पृथ्वी ते शोषून घेवो, त्या तारणास अंकुर फुटोत आणि त्याचबरोबर धार्मिकता एकत्रित वाढो. मी परमेश्वराने त्या दोघांना निर्मिले आहे.
मी इस्राएलास दहीवरासारखा होईल, तो भुकमळासारखा फुलेल आणि लबानोनात देवदारूप्रमाणे मुळ धरील.
जसे परमेश्वराकडून दहिवर येते, जशा गवतावर सरी येतात आणि त्या मनुष्याची वाट पाहत नाही व मनुष्याच्या मुलाची वाट पाहत नाही, तसे याकोबचे उरलेले लोक पुष्कळ लोकांच्यामध्ये होतील.
हे सर्व किती मनोरम व किती सुंदर होईल! तरुण पुरुष धान्याने आणि कुमारी गोड द्राक्षरसाने पुष्ट होतील.
¶ इसहाकाने, याकोबाला व एसावाला येणार्या गोष्टींविषयी विश्वासाने, आशीर्वाद दिला.