TSK

TSK · उत्प 32:3

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

एसाव याकोबास म्हणाला, “मी तुला विनंती करतो, मला थोडे तांबडे डाळीचे वरण खायला घेऊ दे. मी फार दमलो आहे!” म्हणून त्याचे नाव अदोम पडले.

तर माझे धनी आपण आपल्या सेवकापुढे जा. मी माझी गुरेढोरे, शेरडेमेंढरे इत्यादी जनावरांना जितके चालवेल आणि माझी लहान मुलेही थकणार नाहीत अशा चालीने सावकाश चालेन व आपणास सेईर प्रदेशामध्ये येऊन भेटेन.”

एसाव आपल्या स्त्रिया, आपली मुले, आपल्या मुली आणि आपल्या घरातील सर्व माणसे, आपली गुरेढोरे, आपली सर्व जनावरे, आणि आपली सर्व मालमत्ता जी त्याने कनान देशात जमा केली होती हे सर्व घेऊन आपला भाऊ याकोब ह्याच्या पूर्वेकडील देशात गेला.

एसावाच्या वंशजांनाही देवाचे असेच पाठबळ होते. पूर्वी सेईर येथे होरी लोक राहत असत. त्यांनी त्यांना हुसकावून लावले. पण एसावाच्या वंशजांनी होरींचा संहार केला व आजपर्यंत ते तेथे राहतात.

आणि इसहाकाला याकोब व एसाव दिला, एसावाला सेईर डोंगर तो वतन करून दिला, परंतु याकोब हा त्याच्या पुत्रपौत्रांसह मिसर देशी गेला.

आणि अलीशाने प्रार्थना केली. तो म्हणाला, “हे परमेश्वरा, माझ्या सेवकाचे डोळे उघड म्हणजे त्यास नीट दिसेल.” परमेश्वराने त्या सेवकाचे डोळे उघडले. तेव्हा त्यास अलीशाच्या भोवती अग्नीचे घोडे आणि रथ डोंगरावर पसरलेले दिसले.

(त्या स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलतो) हे राजकन्ये, त्या चपलांमधे तुझे पाय सुंदर दिसतात. कुशल कारागिराच्या हातच्या दागिन्यासारखा तुझ्या माड्यांचा बांक आहे.

मग त्याने आपल्यापुढे निरोपे पाठवले, तेव्हा ते निघून त्याच्यासाठी तयारी करण्यास शोमरोन्यांच्या एका गावात गेले,