TSK

TSK · इब्री 12:7

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तर तुम्ही जो माझा यज्ञ व जे माझे अर्पण मी जिथे राहतो तिथे आज्ञापिले आहे, त्यांना तुम्ही का लाथ मारता? आणि माझे लोक इस्राएलांच्या सर्व अर्पणातील जी उत्तम त्यांकडून आपणाला पुष्ट करण्यास माझ्यांपेक्षा आपल्या मुलांचा तू का अधिक आदर करतोस?

कारण मी त्यास सांगितले की जो अन्याय त्यास माहित आहे, त्यामुळे मी त्याच्या घराण्याला निरंतर न्यायदंड करीन कारण त्याच्या मुलांनी आपणावर शाप आणला तरी त्याने त्यांना आवरले नाही.

“तू असे का करतोस?” असे म्हणून दाविदाने त्यास कधी दुखावलेले नव्हते, शिवाय अदोनीया हा दिसायलाही सुंदर होता, अबशालोमानंतर त्याचा जन्म झाला होता.

जर तो मनुष्य देवाला म्हणेल की. मी अपराधी आहे. यापुढे मी पाप करणार नाही.

काही आशा असेल तर आपल्या मुलाला शिक्षा कर, आणि त्याच्या मरणाची तुझ्या जिवाला काळजी वाटू देऊ नको.

मुलाला शिक्षा करण्यास अवमान करू नको; कारण जर तू त्यास छडीने मारले तर तो मरणार नाही.

आपल्या मुलाला शिस्त लाव आणि तो तुला विसावा देईल आणि तो तुझा जीव आनंदित करील.