TSK

TSK · इब्री 13:7

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ ‹तर ज्याला त्याच्या धन्याने आपल्या परिवाराला, त्यांना त्याचे अन्न वेळेवर द्याव म्हणून नेमल आहे तो विश्वासू आणि विचारी दास कोण आहे?›

तेव्हा प्रभू म्हणाला, ‹“प्रभू त्याच्या इतर नोकरांना त्यांचे धान्य योग्यवेळी देण्यासाठी ज्याची नेमणूक करील असा व विश्वासू कारभारी कोण आहे?›

परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले, तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला.

पौल व बर्णबाने प्रत्येक मंडळीत वडीलजनांची नेमणूक केली, त्यांनी या वडिलांसाठी उपवास आणि प्रार्थना केल्या, प्रभू येशूवर विश्वास असलेले असे सर्व वडीलजन होते म्हणून पौलाने व बर्णबाने त्यांना प्रभूच्या हाती सोपवले.

यास्तव मी तुम्हास बोध करतो की माझे अनुकरण करा.

¶ मी जसे ख्रिस्ताचे अनुकरण करतो तसे माझे अनुकरण करणारे व्हा.

तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन अंगीकारुन आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला;

¶ आणि बंधूंनो, आम्ही तुम्हास विनंती करतो की, जे तुमच्यांत परिश्रम करतात, जे प्रभूमध्ये तुमच्यांवर आहेत आणि तुम्हास बोध करतात त्यांच्याकडे लक्ष द्या;

तसा आम्हास अधिकार नाही असे नाही, पण आमचे अनुकरण करण्यासाठी आम्ही तुम्हास उदाहरण घालू द्यावे म्हणून असे केले.

आम्हास असे वाटते की, तुम्ही आळशी बनू नये. तर जे लोक विश्वासाद्वारे व धीराद्वारे देवाने दिलेल्या अभिवचनाचा वारसा मिळवतात अशा लोकांचे अनुकरण करणारे तुम्ही व्हावे.

¶ तुमच्या सर्व पुढाऱ्यांना व देवाच्या सर्व पवित्रजणांना सलाम सांगा, इटली येथील विश्वास ठेवणारे लोक तुम्हास सलाम सांगतात.

¶ जेव्हा कोकऱ्याने पाचवा शिक्का उघडला तेव्हा मी, वेदीखाली आत्मे पाहिले, ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जिवे मारलेल्या लोकांचे आत्मे होते.