परंतु या सर्व लोकांच्या देवाला तू नमन करू नकोस; त्यांची सेवा करू नकोस, त्यांना जमीनदोस्त करावेस; आणि त्यांच्या स्तंभाचे तुकडे तुकडे करावेस.
TSK
TSK · होशे 10:2
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
पण ते दुसऱ्या दिवशी पहाटेस उठल्यावर, पाहा, परमेश्वराच्या कोशापुढे दागोन भूमीवर पालथा पडला आहे आणि दागोनाचे डोके व त्याच्या हाताचे दोन्ही पंजे तुटलेले उंबऱ्यावर पडले आहेत. दागोनाचे धड तेवढे त्यास राहिले होते.
दुष्ट मनुष्य त्याचे वेतन मिळविण्यासाठी लबाड बोलतो, परंतु जो नीतीने पेरतो त्याचे वेतन सत्याची कापणी असते.
तो मिसर देशामधील बेथ-शेमेश त्याचे स्तंभ मोडून टाकील. तो मिसरी देवतांची मंदिरे जाळून टाकील.”
एफ्राईम त्या लोकांसोबत मिसळतो, एफ्राईम न पलटलेल्या भाकरीसारखा झाला आहे.
शोमरोनाचे रहिवासी बेथआवेनच्या वासरांसाठी घाबरे होतील त्यांचे लोक त्यांच्यासाठी विलाप करतील, सोबतच त्यांचे मुर्तीपुजक पुजारी जे त्याच्या वैभवावर आनंद करत होते आता ते त्यांच्याबरोबर नाहीत.
मी तुझ्या कोरीव मूर्तींचा आणि दगडी स्तंभांचा नाश करीन. तुमच्या हातांनी घडविलेल्या वस्तूंची तुम्ही पूजा करणार नाही.
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “त्यावेळी देशांतील सर्व मूर्तींचे मी उच्चाटन करीन. लोकांस त्यांची नावेसुध्दा आठवणार नाहीत. मी ढोंगी संदेष्ट्यांचा आणि अशुद्ध आत्म्यांचा नायनाट करीन.
‹कोणत्याही नोकराला दोन मालकांची सेवा करता येत नाही. एकाचा तो राग करील व दुसऱ्यावर तो प्रीती करील किंवा एकाला तो धरून राहील व दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्ही एकाच वेळी देवाची व पैशाची सेवा करू शकत नाही.”›
कारण तो द्विमनाचा असून तो सर्व मार्गात अस्थिर असतो.
¶ जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्याठायी पित्याची प्रीती नाही.