जो याजक पापबली अर्पील त्याने तो खावा. दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र ठिकाणी तो खावा.
TSK
TSK · होशे 4:8
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
तर तुम्ही जो माझा यज्ञ व जे माझे अर्पण मी जिथे राहतो तिथे आज्ञापिले आहे, त्यांना तुम्ही का लाथ मारता? आणि माझे लोक इस्राएलांच्या सर्व अर्पणातील जी उत्तम त्यांकडून आपणाला पुष्ट करण्यास माझ्यांपेक्षा आपल्या मुलांचा तू का अधिक आदर करतोस?
ज्याचे हात निर्मळ आहेत, ज्यांचे हृदय शुद्ध आहे, ज्याने आपला जीव खोटेपणाकडे उंचावला नाही, आणि ज्याने दुष्टपणाने शपथ वाहिली नाही.
त्या कुत्र्यांची भूक मोठी आहे; त्यांना कधीच पुरेसे मिळत नाही; ते विवेकहीन मेंढपाळ आहेत; ते सर्व आपापल्या मार्गाकडे, प्रत्येकजण लोभाने अन्यायी मिळकतीकडे वळले आहेत.
इस्राएलाच्या घराण्यातील प्रत्येकजण आणि इस्राएलात जे मला योग्य तेच आहे आणि ज्यांनी मूर्तीपुजेत अशा पापाचा अडखळण धोंडा आपल्या मनापासून आपल्यात वागवला. आणि माझा शोध घेण्यास भविष्यवक्तांकडे येतात, मी परमेश्वर देव आहे स्वतः त्यांना उत्तर देईन.
“अहा! तुम्ही माझ्या वेदीवर अग्नी पेटवू नये म्हणून दारे बंद करील असा तुम्हामध्ये कोणी असता तर किती चांगले झाले असते! मी तुमच्या हातातले अर्पण स्विकारणार नाही, कारण तुम्हा विषयी मी आनंदी नाही,” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
त्यांची तोंडे बंद केली पाहिजेत; त्यांनी शिकवू नयेत त्या गोष्टी ते अयोग्य लाभासाठी शिकवतात आणि संपूर्ण घराची उलथापालथ करतात.