TSK

TSK · होशे 9:10

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ नंतर ते लोक अष्कोलच्या खोऱ्यात गेले. तेथे त्यांनी द्राक्षाच्या वेलीची एक फांदी तोडली. त्या फांदीला द्राक्षाचा घोसासहीत त्यांनी ती फांदी एका खांबावर ठेवली आणि दोघेजण ती आपल्या मधोमध ठेवून घेऊन गेले. त्यांनी बरोबर काही डाळिंबे व अंजीर ही घेतली.

लोक जेव्हा कापणीच्या वेळी धान्य गोळा करतात तेव्हा प्रथम गोळा केलेले धान्य ते परमेश्वराकडे आणतात. म्हणून मी या गोष्टी तुला देतो आणि तुझ्या कुटुंबातील शुद्ध माणसे ते खाऊ शकतात.

इस्राएल लोकांनी बआल-पौराच्या देवांची उपासना करायला सुरुवात केली आणि परमेश्वराचा राग इस्राएलांवर भडकला.

याकोब त्यास तो वाळवंटात भणभणत्या वाऱ्याच्या वैराण प्रदेशात सापडला त्याने त्याच्याजवळ राहून त्याची काळजी घेतली आणि डोळ्यातील बाहूलीप्रमाणे त्यास सांभाळले.

तेव्हा त्याच दिवशी त्याने त्यास “यरूब्बाल” म्हटले, तो म्हणाला, “गिदोनाने बआलाची वेदी पाडून टाकली म्हणून बआलानेच त्याच्याविरुध्द स्वतःचा बचाव करावा,” कारण त्याची वेदी गिदोनाने मोडून वेगळी केली.

आणि परमेश्वराने जी राष्ट्रे त्यांच्या समोरून घालवून दिली होती, त्यांच्यासारखेच त्यांनी उंचस्थानावर धूप जाळला आणि परमेश्वरास संताप येईल आशाप्रकारची वाईट कामे केली. त्या नीच कृत्यांनी परमेश्वराचा राग भडकला.

त्यांनी बआल-पौराची पूजा केली, आणि मरण पावलेल्यांना अर्पण केलेले बली त्यांनी खाल्ले.

त्याच्या वैभवशाली सौंदर्याचे कोमेजणारे फूल, जे खोऱ्याच्या माथ्यावर आहे, उन्हाळ्यात झाडावर प्रथम आलेल्या अंजिरांप्रमाणे त्याची स्थिती होईल, त्याकडे पाहणारा पाहतो तेव्हा तो त्याच्या हातांत असतानांच तो खाऊन टाकतो.

तरीही लाजेच्या देवाने आमच्या वडिलांच्या मालकीचे सर्वकाही खाल्ले आहे. त्या खोट्या दैवताने आमच्या पूर्वजांची मुले व मुली, मेंढ्या व गुरे आणि त्यांची कोकरे व वासरे गिळली आहेत.

भविष्यवादी खोटेपणाने भविष्य सांगतात, आणि याजक त्यांच्या शक्तीने अधिकार गाजवतात. ते काम ते करणार नाहीत. आणि माझ्या लोकांस हे प्रिय आहे! पण शेवटी काय होणार?”

एका टोपलीत खूप चांगली अंजीर होती. ती मोसमाच्या सुरवातीला पिकलेल्या अंजिरासारखी होती. पण दुसऱ्या टोपलीत नासकी अंजीर होती. ती खाण्यालायक नव्हती.

तरीही त्यांनी माझा तिव्र विरोध केला आणि ते माझे ऐकेनात त्यातीत प्रत्येकाने मिसर देशातील मूर्ती, दैवत अशा तिरस्कार आणणाऱ्या वस्तू फेकून दिल्या नाही आणि म्हणून मी त्यांना त्वेषाने माझा क्रोध मिसरावर ओतीन, तरच मी समाधान पावेन, हा माझा केलेला ठराव आहे.

तुमच्या मुली जारकर्म करतात व सुना व्यभिचार करतात तेव्हा मी त्यांना शासन करणार नाही कारण पुरुष स्वत: वेश्येकडे वेगळे होऊन जातात, आणि कलावंतिणींबरोबर यज्ञ करतात; हे विवेकहीन लोक आहेत, ते नाश पावतील.

मी तुम्हास रानात, रुक्ष प्रदेशात जाणून होतो.

¶ मला हायहाय! मी अस्वस्थ झालो आहे, कारण माझी स्थिती उन्हाळ्यातल्या वगळ फळांसारखी झाली आहे, काढणीच्या द्राक्षांसारखी झाली आहे, खायला एकही घोंस नाही, पण तरीही प्रथम पिकलेल्या अंजीर फळाची हाव आहे.