TSK

TSK · यश 15:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ कोणा मनुष्याचे केस गळून पडू लागले तर ते केवळ टक्कल आहे; तो मनुष्य शुद्ध होय.

¶ याजकांनी आपल्या डोक्याचे मुंडण करु नये; आपल्या दाढीचे कोपरे छाटू नयेत किंवा आपल्या शरीरावर घाव करु नयेत;

अटारोथ, दीबोन, याजेर, निम्रा, हेशबोन, एलाले, सबाम, नबो व बौन.

¶ तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची मुले आहात. तेव्हा कोणी मरण पावले तर अंगावर वार करून घेणे, मुंडण करणे असे करु नका.

आणि त्याची प्राप्त झालेली सीमा ही होती, आर्णोन नदीच्या काठावर जे अरोएर, म्हणजे त्या खोऱ्याच्या मध्यभागी जे नगर, तेथून मेदबाजवळचा सर्व पठारी प्रदेश;

तेव्हा ईयोबाने ऊठून, त्याचा झगा फाडला, त्याने डोक्याचे मुंडन केले, भूमीकडे तोंड करून पालथा पडला आणि देवाची उपासना केली.

वेशीनो मोठ्याने आक्रोश करा; नगरांनो आरोळी करा. पलिष्टी तू सर्व वितळून जाशील. कारण उत्तरेकडून धुराचे ढग येत आहे आणि तेथे त्याच्या सैन्यात मागे राहणारा कोणी नाही.

यामुळे मवाब मवाबाकरता आकांत करील, प्रत्येकजण आकांत करील. कीर-हेरेसेथाच्या मनुकांच्या ढेपांसाठी जे पूर्णपणे उध्वस्त झाले आहे तुम्ही त्यासाठी शोक कराल.

त्या दिवसात सेनाधीश परमेश्वर म्हणाला, रडावे, शोक करावा व टक्कल पाडावे आणि गोणताट घालावे.

¶ गज्जाला टक्कल पडले आहे. त्यांच्या खोऱ्यातील उरलेले अष्कलोनाचे लोक शांत झाले आहेत. तुम्ही कोठवर शोकाने आपल्या स्वत:ला जखमा करून घेणार?

अगे तू दीबोनात राहणाऱ्या कन्ये, तू आपल्या मानाच्या जागेवरून खाली ये आणि कोरड्या जमिनीवर बस. कारण मवाबाचा विनाश करणारा तुझ्यावर आला आहे तो तुझे बालेकिल्ले नष्ट करील.

म्हणून मी मवाबासाठी आक्रोश करून विलाप करीन आणि सर्व मवाबासाठी दुःखाने आरोळी मारीन. कीर हरेसाच्या लोकांसाठी मी आक्रंदन करील.

हे हेशबोना, विलापात आक्रोश कर, कारण आय याचा नाश झाला आहे! राब्बातील कन्यांनो, मोठ्याने ओरडा! तागाची वस्त्रे घाला, आकांत करा आणि तुम्ही व्यर्थ इकडे तिकडे धावाल कारण मिलकोम राजा आपले याजक व अधिकाऱ्याबरोबर एकत्रित बंदिवान होऊन जाईल.

मी तुमचे उत्सव पालटून शोक असे करीन, आणि तुमची सर्व गाणी पालटून विलाप अशी करीन. मी प्रत्येकाला गोणताटाचे कपडे घालीन. मी प्रत्येक डोक्याचे मुंडन करीन. ए कुलता एक मुलगा गेल्यावर जसा आकांत होतो, तसा मी करीन. तो फारच कडू शेवट असेल.”