TSK

TSK · यश 17:3

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तेव्हा अश्शूरच्या राजाने आहाजाचे ऐकले आणि दिमिष्कावर स्वारी करून ते काबीज केले आणि तेथील लोकांस त्याने कीर येथे पकडून नेले. रसीन यालाही त्याने ठार केले.

कारण अरामाचे शीर दिमिष्क व दिमिष्काचे शीर रसीन आहे. पासष्ट वर्षांच्या आत एफ्राईम भंग पावेल व तेथील लोक एक राष्ट्र म्हणून राहणार नाहीत.

कारण लेकराला आई, बाबा, अशी हाक देता येण्या आधीच अश्शूरचा राजा पुढे दिमिष्काचे धन व शोमरोनाची लूट घेऊन जाईल.”

पुन्हा परमेश्वर बोलला, “तीन वर्षांच्या आतच, मवाबाचे गौरव नाहीसे होईल; त्यांचे लोक पुष्कळ असूनही, अवशेष फार थोडे आणि क्षुल्लक राहील.

एफ्राइममधील मद्यप्यांनो तुमच्या गर्वाच्या मुकुटाला हायहाय! आणि धुंद झालेल्या सुपिक खोऱ्याच्या माथ्यावरील मोठी शोभा देणारे जे कोमेजणारे फुल त्यास हायहाय!

¶ गोमर पुन्हा गरोदर झाली आणि तिला मुलगी झाली तेव्हा परमेश्वर होशेय ला म्हणाला हिचे नांव लो-रुहामा ठेव कारण यापुढे मी इस्राएल राष्ट्रावर दया करणार नाही व त्यास क्षमा करणार नाही.

जेव्हा एफ्राईमाने आपला रोग आणि यहूदाने आपली जखम पाहिली तेव्हा एफ्राईम अश्शूराकडे गेला, आणि आपला दूत त्याने महान राजाकडे पाठविला; पण तो त्यास आरोग्य देऊन त्यांची जखम बरी करू शकला नाही.

एफ्राईमाचे गौरव पक्षाप्रमाणे उडून जाईल तिथे जन्म, गरोदरपणा आणि गर्भधारणा होणार नाही.

म्हणून तुझ्या लोकांमध्ये युध्दाचा गलबला होईल आणि तुझी सर्व तटबंदीची शहरे नष्ट होतील. हे असे घडेल जसे शल्मनाने बेथ-आर्बिलाच्या युध्दात नाश केला तेव्हा आईला मुलांसह आपटून मारले गेले.

एफ्राईम आपल्या भावांमध्ये जरी प्रगत झाला, तरी पूर्वेचा वारा येईल, परमेश्वराचा वारा रानातून येईल एफ्राईमाचा झरा सुकून जाईल, त्याच्या विहिरीत पाणी राहणार नाही. त्यांचा शत्रू त्याच्या सर्व मौल्यवान वस्तू लुटून नेईल.

अश्दोद व मिसर देशाच्या उंच मनोऱ्यांवरून पुढील संदेशाची घोषणा करा: “शोमरोनच्या पर्वतांवर एकत्र जमा, आणि त्यामध्ये किती भयंकर गोंधळ आणि काय जुलूम आहेत ते पाहा.

तर आता ते पाडाव होऊन पहिल्याने पाडाव झालेल्यांसहीत पाडावपणांत जातील, आणि ख्यालीखुशालीत वेळ घालवणाऱ्यांचा गोंधळ नष्ट होईल.

विस्तवाजवळ ठेवल्यास मेण वितळते, तसे त्याच्या पायाखाली पर्वत वितळतील, दऱ्या दुभंगतील, आणि उंच टेकड्यावरून वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे ते वाहू लागतील.