TSK

TSK · यश 20:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

परमेश्वराचा सेनापती यहोशवाला म्हणाला, “आपल्या पायातले जोडे काढ; कारण ज्या जागी तू उभा आहेस ती पवित्र आहे.” तेव्हा यहोशवाने तसे केले.

मग दावीद घरातील सर्वांना आशीर्वाद द्यायला घरात आला. तेव्हा शौलकन्या मीखल हिने त्यास गाठले आणि ती म्हणाली, “इस्राएलाच्या राजाने आज आपला सन्मान राखला नाही. नोकरा-चाकरांसमोर, दासीसमोर त्या मूर्खांपैकीच एक असल्याप्रमाणे तुम्ही आपले वस्त्र काढलेत!”

तेव्हा ईयोबाने ऊठून, त्याचा झगा फाडला, त्याने डोक्याचे मुंडन केले, भूमीकडे तोंड करून पालथा पडला आणि देवाची उपासना केली.

¶ परमेश्वर मला असे म्हणाला: “जा आणि तागाचा कमरबंद विकत घे आणि तो आपल्या कमरेस बांध, पण पहिल्याने तो पाण्यात घालू नको.”

मी तुझ्यावर त्यांच्या शिक्षेची जबाबदारी प्रत्येक वर्षाची तीनशे नव्वद दिवस सोपवून दिली आहे, तू इस्राएलाच्या घराण्याचे अपराध वाहून नेशील.

त्यापेक्षा आपल्या डोक्यात फेटा आणि पायात जोडा घाला तू खेद व आसवे गाळणार नाहीस, तुझ्या अपराधासाठी वितळले जाशील प्रत्येक त्यांच्या भावंडासाठी विव्हळ होईल.

शाफीरमध्ये राहणारे लोकहो, तुम्ही नग्न आणि लज्जित होऊन निघून जा. सनानिवासी बाहेर निघून येत नाही, बेथ-एसलासचा शोक करेल, कारण त्यांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे.

¶ या योहानाचे वस्त्र उंटाच्या केसाचे होते, त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता. त्याचा आहार टोळ व रानमध होता.

¶ तेव्हा ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, “तो प्रभू आहे.” शिमोन पेत्राने ऐकले की, तो “प्रभू आहे, प्रभू आहे” तेव्हा तो उघडा असल्यामुळे (त्याने बाहेरील वस्त्र, झगा, न घातल्यामुळे) त्याने कमरेला झगा गुंडाळला आणि सरोवरात उडी घेतली.

आणि मी माझ्या दोन साक्षीदारांना अधिकार देईन. ते तरटाची वस्त्रे घालून, एक हजार दोनशे साठ दिवस देवाचा संदेश देतील.”