जे लिव्याथानाला जागविण्यात निपुण आहेत ते त्या दिवसास शाप देवो.
TSK
TSK · यश 27:1
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
त्याचा नि:श्वास आकाशातील वादळ स्वच्छ करतो त्याच्या हातांनी पळून जाणाऱ्या सापाला नष्ट केले.
हे बलवाना, तू आपली तलवार मांडीला बांध, आपले वैभव आणि आपला प्रताप धारण कर.
तेथे त्यामध्ये जहाजे प्रवास करतात आणि त्यामध्ये खेळण्यासाठी जो लिव्याथान तू निर्माण केला तोही तेथे आहे.
ज्यावेळेस माझी स्वर्गीय तलवार रक्ताने माखेल, पाहा, ती आता अदोमावर उतरली आहे, ज्या लोकांचा समूळ नायनाट करण्याचे मी ठरविले आहे त्यांच्यावर ती उतरेल.
लांडगे आणि कोकरे एकत्र चरतील, आणि सिंह बैलाप्रमाणे गवत खाईल. पण धूळ ही सापाचे अन्न होईल. माझ्या पवित्र पर्वतात कोणी उपद्रव किंवा नाश करणार नाही असे परमेश्वर म्हणतो.
हे परमेश्वराच्या तलवारी, तू किती वेळपर्यंत शांत राहणार? तू परत आपल्या म्यानात जा. थांब आणि शांत रहा.
यरूशलेम म्हणते, बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने मला खाऊन टाकले आहे. त्याने मला निचरून कोरडे केले आहे आणि मला रिकामे पात्र करून ठेवले आहे. त्याने मला अजगराप्रमाणे गिळून टाकले आहे.
मानवाच्या मुला, मिसराचा राजा फारोविषयी मोठ्याने विलाप कर. त्यास म्हण, राष्ट्रांमध्ये मी तुला तरुण सिंहाची उपमा दिली होती, तरी तू समुद्रातील मगर असा आहेस. तू पाणी घुसळून काढतोस, तू आपल्या पायाने पाणी ढवळून काढतो आणि त्यांचे पाणी गढूळ करतोस.
¶ आणि स्वर्गात दुसरे एक चिन्ह दिसले. पाहा! तेथे एक मोठा, लाल अजगर; त्यास सात डोकी व दहा शिंगे होती आणि त्याच्या डोक्यांवर सात मुकुट होते.
¶ आणि मी बघितले की, आणखी एक पशू भूमीतून वर येत आहे. त्यास कोकऱ्यासारखी दोन शिंगे होती; आणि तो अजगरासारखा बोलत होता.
¶ मग त्या सात वाट्या घेणारे जे सात देवदूत होते त्यांच्यातला एक येऊन माझ्याशी बोलला आणि म्हणाला, “ये, त्या अनेक जलांवर जी बसली आहे त्या महावेश्येचा न्यायनिवाडा मी तुला दाखवतो.
बाकीचे लोक जो घोड्यावर बसला होता त्याच्या तोंडातून बाहेर येणाऱ्या तलवारीने मारले गेले आणि त्यांच्या मांसाने सगळे पक्षी तृप्त झाले.