TSK

TSK · यश 28:29

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

जो सर्वशक्तिमान तो महान आहे आपणाला त्याचा शोध लागत नाही, तो सामर्थ्यवान आहे न्यायाने वागतो. तो लोकांस त्रास देत नाही.

हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती महान आहेत, तुझे विचार फार गहन आहेत.

परमेश्वराने हे केले आहे; आमच्या दृष्टीने ते अतिशय अद्भुत आहे.

जसा परासीम डोंगरामध्ये परमेश्वर उभा राहिला होता, जसा तो गिबोन दरीत रागावला होता त्याप्रमाणे तो रागावेल. अशासाठी की त्याने आपले कार्य, त्याचे अद्भूत कृत्य आणि त्याचे विस्मयकारी कृत्य करावे.

¶ तू चातुर्याने थोर व कृतीने पराक्रमी आहेस कारण प्रत्येकाला त्याच्या आचरणाप्रमाणे व त्याच्या कृतीच्या योग्यतेप्रमाणे फळ द्यावे म्हणून तुझे डोळे लोकांचे मार्ग पाहण्यास उघडे आहेत.

¶ अहाहा! देवाच्या सुज्ञतेच्या व ज्ञानाच्या धनाची खोली किती? त्याचे न्याय किती अतर्क्य आहेत? आणि त्याचे मार्ग किती अलक्ष्य आहेत?