परमेश्वर तुम्हास जहाजातून पुन्हा मिसरला पाठवील. जेथे तुम्हास पुन्हा कधी परतून जावे लागणार नाही असे मी म्हणालो होतो तेथे परमेश्वर तुमची रवानगी करील. मिसरमध्ये तुम्ही शत्रूचे दास म्हणून स्वत:ची विक्री करु बघाल पण कोणीही तुम्हास विकत घेणार नाही.
TSK
TSK · यश 30:2
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
तेव्हा काटेरी झुडपाने त्या झाडांना म्हटले, ‘जर तुम्ही खरेपणाने मला अभिषेक करून राजा करीत असाल, तर येऊन माझ्या छायेचा आश्रय घ्या; नाही तर काटेरी झुडुपातून विस्तव निघून लबानोनावरल्याचे गंधसरूस जाळून टाकील.’
पण होशेचे आपल्याविरुध्द कटकारस्थान चालू आहे हे अश्शूरच्या या राजाच्या लक्षात आले, कारण होशेने मिसरचा राजा सो याच्याकडे आपले दूत पाठवले होते. तसेच दरवर्षीप्रमाणे त्यावर्षी होशेने खंडणीही दिली नव्हती. तेव्हा अश्शूरच्या राजाने त्यास अटक करून कैदेत टाकले.
सूचना दे, न्याय अंमलात आण; दुपारी तू आपली सावली रात्रीसारखी कर; शरणार्थीस लपीव; शरणार्थींचा विश्वासघात करू नकोस.
¶ जो कूश त्यांची आशा आणि जो मिसर देशाचे वैभव त्यामुळे ते हताश व लज्जित होतील.”
¶ पाहा, तू या मिसराच्या ठेचलेल्या बोरूच्या चालण्याच्या काठीवर विश्वास ठेवतोस, पण जर मनुष्य आपल्या हातातील काठीवर टेकतो, तर तो भेदून जाईल; जे कोणी एक मिसराचा राजा फारो याच्यावर भरवसा ठेवतात, तो त्यांना तसाच आहे.”
तर आता, शिहोराचे पाणी पिण्यास मिसरच्या रस्त्यात तुला काय काम आहे? आणि फरात नदीचे पाणी पिण्यासाठी अश्शूराची वाट का धरावी?
मिसरातून फारोचे सैन्य बाहेर आले आणि ज्या खास्द्यांनी यरूशलेमला वेढा घातला होता त्यांनी हे वर्तमान ऐकले आणि यरूशलेम सोडून गेले.
तुम्ही कदाचित् म्हणाल, नाही, आम्ही मिसर देशामध्ये जाऊन राहू, तेथे आम्हास कोणतेही युध्द दिसणार नाही, तेथे आम्ही रणशिंगाचा आवाज ऐकणार नाही आणि तेथे आम्ही अन्नासाठी भुकेले होणार नाही. आम्ही तेथे राहू.
ते मिसर देशात, तहपन्हेस येथे गेले, कारण त्यांनी परमेश्वराची वाणी ऐकली नाही.
मग मिसरमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांस कळून येईल की मीच परमेश्वर आहे. कारण ते इस्राएलाच्या घराण्याला बोरूची काठी असे झाले आहेत.
कारण ते अश्शूरास रानगाढवासारखे गेले, एफ्राईमाने आपल्यासाठी प्रियकर नेमले आहेत.