TSK

TSK · यश 30:28

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

अबशालोम आणि सर्व इस्राएल लोक म्हणाले, अहिथोफेलपेक्षा हूशय अर्की याचा सल्ला चागंला आहे. आणि तो सर्व लोकांस पसंत पडला, कारण ती परमेश्वराची योजना होती. अबशालोमला अद्दल घडावी म्हणून अहिथोफेलचा चांगला सल्ला थोपवून कुचकामी ठरवण्याचा तो परमेश्वराचा बेत होता. अशा प्रकारे तो अबशालोमला अद्दल घडवणार होता.

माझ्याविरुध्द तू उठलास, तुझे उन्मत्त बोलणे मी ऐकले. तेव्हा, मी आता तुझ्या नाकात वेसण घालतो आणि तोंडात लगाम अडकवतो. मग तुला माघारे वळवून ज्या रस्त्याने आलास त्याच वाटेने तुला परत फिरवतो.”

तेव्हा जलाशयाचे तळ दिसू लागले, तुझ्या युद्धाच्या गदारोळाने आणि तुझ्या नाकपुड्याच्या श्वासाच्या सोसाट्याने हे परमेश्वरा, जगाचे पाये उघडे पडले.

घोड्याला चाबूक, गाढवाला लगाम, आणि मूर्खाच्या पाठीला काठी आहे.

याउलट तो दीनांचा न्याय चांगुलपणाने करील व पृथ्वीवरील दिनांचा यथार्थ निर्णय करील. तो आपल्या मुख दंडाने पृथ्वीला तडाखा देईल. आणि फुंकराने दुष्टांना ठार करील.

तेव्हा पाहा, संध्याकाळी दहशत! आणि पहाटेपूर्वी ती नाहीशी होते; जे आम्हांला लुटतात त्यांचा हा वाटा आहे, आणि जे आम्हास लुबाडतात त्यांचा हिस्सा हाच आहे.

मग ते, तुझी सुज्ञ माणसे कोठे आहेत? तर आता त्यांनी तुला सांगावे आणि सेनाधीश परमेश्वराने मिसराबद्दल काय योजले आहे ते त्यांनी समजावे.

सेनाधीश परमेश्वराकडून, भूकंप, मोठीगर्जना व मोठे वादळ, वावटळ आणि खाऊन टाकणारी अग्नी, यांनी तुला शासन करण्यात येईल.

कारण माझ्याविरूद्धच्या तुझ्या क्रोधामुळे आणि व तुझा उद्धटपणा माझ्या कानी पोहचला आहे, मी आपले वेसण तुझ्या नाकात व आपला लगाम तुझ्या तोंडात घालीन; तू ज्या मार्गाने आलास त्यानेच मी तुला मागे फिरवीन.

म्हणून पहाटेच्या ढगासारखे लवकर उडून जाणाऱ्या दवासारखे खळ्यातून वाऱ्याने उडणाऱ्या भुसासारखे आणि धुराडयातून उडणाऱ्या धुरासारखे ते होतील.

तू रागाच्या भरात पृथ्वीवरून चाल केली आणि क्रोधाने राष्ट्रे पायाखाली तुडविलीस.

¶ ‹शिमोना, शिमोना, ऐक! सैतानाने तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून मागितले आहे.›

त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून देव त्यांच्याठायी भ्रांतीचे कार्य चालेल असे करतो;

त्याच्या उजव्या हातात सात तारे होते; त्याच्या तोंडातून दोन्ही बाजूंनी तीक्ष्ण धार असणारी तलवार निघाली होती. त्याचा चेहरा दिवसाच्या अतिशय प्रखर तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखा दिसत होता.