तर आता पाहा. मी माझ्या मनुष्यांकडे परत जात आहे. पण मी तुला एक इशारा देतो. इस्राएलाचे हे लोक भविष्यात तुला आणि तुझ्या लोकांस काय करतील ते सांगतो.
TSK
TSK · यश 30:8
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
“तेव्हा तुम्ही हे गीत लिहून घ्या व इस्राएल लोकांस शिकवा. त्यांच्याकडून ते तोंडपाठ करून घ्या. म्हणजे इस्राएल लोकांविरूद्ध ही माझ्याबाजूने साक्ष राहील.
माझ्या मृत्यूनंतर तुम्ही दुराचरण करणार आहात हे मला माहीत आहे. मी सांगितलेल्या मार्गापासून तुम्ही ढळणार आहात. त्यामुळे भविष्यात तुमच्यावर संकटे कोसळतील. कारण परमेश्वराने निषिद्ध म्हणून सांगितलेल्या गोष्टी तुम्ही करणार आहात. तुमच्या दुष्कृत्याने तुम्ही परमेश्वराचा राग ओढवून घ्याल.”
शेवटल्या दिवसात, परमेश्वराचे डोंगरावरील मंदिर, पर्वताच्या सर्वात उंच जागी स्थापण्यात येईल, आणि ते डोंगरावर उंच होईल; व सर्व राष्ट्रे त्याकडे लोटतील.
परमेश्वराने आपल्या हृदयातील हेतू सिद्धीस नेई पर्यंत, त्याचा राग परतणार नाही. शेवटल्या दिवसात तुम्हास हे समजेल.
¶ मग यिर्मयाने नेरीयाचा मुलगा बारूख याला बोलावले आणि परमेश्वराने त्याच्याशी बोललेली सर्व वचने यिर्मयाने सांगितली व बारूखाने पटावर लिहून काढली.
“मी पुढील दिवसात मवाबाचा बंदिवास उलटवीन” असे परमेश्वर म्हणतो. येथे मवाबाचा न्यायनिवाडा संपतो.
“तू माझ्या लोकांशी, इस्राएलशी, लढण्यास येशील. तू देशाला व्यापणाऱ्या व प्रचंड गर्जना करणाऱ्या ढगाप्रमाणे येशील. शेवटच्या दिवसात माझ्या देशाशी लढावयास मी तुला आणिन. मग, गोग, राष्ट्रांना माझे सामर्थ्य कळून येईल. ते मला मान देतील. त्यांना कळून चुकेल की मी पवित्र आहे.”
परमेश्वराने मला उत्तर दिले आणि म्हटले, “मी तुला जो दृष्टांत दाखवतो, तो स्पष्टपणे पाट्यांवर लिहून ठेव अशासाठी की जो कोणी ते वाचतो त्याने धावावे!
प्रथम हे ध्यानात ठेवा की, स्वतःच्या वासनेप्रमाणे चालणारे, थट्टाखोर लोक शेवटल्या दिवसात थट्टा करीत येऊन म्हणतील,