TSK

TSK · यश 32:17

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

राजा अहश्वेरोशाच्या राज्यातील एकशेसत्तावीस प्रांतांमधील समस्त यहूद्यांना मर्दखयाने पत्रे लिहिली. त्यामध्ये शांतीची सत्य वचने होती.

पर्वत लोकांसाठी शांती उत्पन्न करतील; टेकड्या न्यायीपणा उत्पन्न करतील.

कारण तो मनुष्य कधीही हलणार नाही; नितीमान मनुष्याची आठवण सर्वकाळ राहील.

परंतु जो कोणी माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो. आणि अरिष्टाची भिती नसल्यामुळे स्वस्थ राहतो.”

“चला, आपण वर परमेश्वराच्या डोंगरावर जाऊ, याकोबाच्या देवाच्या मंदिरात जाऊ, म्हणजे तो आम्हास त्याचे मार्ग शिकवील व आपण त्याच्या मार्गात चालू” असे पुष्कळ लोक म्हणतील. कारण सियोनेतून धर्मशास्त्र व यरूशलेमेतून देवाचे वचन बाहेर येईल.

लांडगा कोकरासोबत राहील, आणि चित्ता करडांजवळ बसेल. वासरू, तरूण सिंह व पुष्ठ बैल एकत्र राहतील लहान मुल त्यांना चालवील.

परमेश्वरा, तुझ्यावर विसंबून असणाऱ्यांना आणि तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना, तू खरी शांती देतोस.

तुझ्याकाळी तो स्थिरता देईल, तारण, सुज्ञता व ज्ञान, यांची विपुलता देईल, परमेश्वराचे भय त्याचा धनसंग्रह होईल.

आणि तुझ्या सर्व मुलांना परमेश्वर शिकवील; आणि तुमच्या मुलांची शांती महान असेल.

कारण तुम्ही आनंदाने बाहेर जाल आणि शांतीने चालवले जाल; तुमच्यापुढे डोंगर आणि टेकड्या आनंदाने जयघोष करतील आणि शेतांतील सर्व झाडे आनंदाने टाळ्या वाजवतील.

परमेश्वर असे म्हणतो “मी तुमच्यावर नदीप्रमाणे हे वैभव पसरवेल, आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांच्या संपत्तीचा वाहणारा ओघ तुमच्या कडे येईल. तुम्ही ते चोखाल, तुम्ही कडेवर वाहिले जाल आणि मांड्यांवर खेळविले जाल.

जो देश माझा सेवक याकोब याला मी दिला, जेथे तुमचे पूर्वज राहत होते. त्यामध्ये ते वस्ती करतील, तेथे ते व त्यांची मुले, व त्यांची नातवंडे सर्वकाळ तेथे राहतील. दावीद हा माझा सेवक त्यांचा सर्वकाळचा अधिपती होईन.

तेव्हा पुष्कळ लोकांच्यामध्ये तो न्याय करील, आणि तो दूरच्या राष्ट्रांविषयी निर्णय ठरवील. ते आपल्या तलवारी मोडून ठोकून त्यांचे नांगर बनवतील, आणि आपल्या भाल्यांचे कोयते करतील. राष्ट्र राष्ट्रांविरुद्ध तलवार उचलणार नाही, आणि त्यांना युध्दाचे शिक्षण दिले जाणार नाही.

कारण खाणे किंवा पिणे ह्यात देवाचे राज्य नाही; पण नीतिमत्त्व, शांती व पवित्र आत्म्यातील आनंद ह्यात आहे.

कशा ही विषयाची काळजी करू नका पण प्रार्थना आणि विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा;

पण जे ज्ञानीपण वरून येते ते प्रथम शुद्ध, त्याशिवाय शांतीशील, सहनशील आणि विचारशील असते. ते दयेने व चांगल्या फळांनी भरलेले असते; ते निःपक्षपाती व निर्दोष असते.

¶ प्रिय मुलांनो, आपण शब्दाने किंवा जीभेने नव्हे, तर कृतीने व खरेपणाने प्रीती करावी.