स्तोत्र 46:6
TSK
राष्ट्रे खळबळतील आणि राज्ये डगमगतील; तो आपला आवाज उंच करील आणि पृथ्वी वितळून जाईल.
TSK
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
राष्ट्रे खळबळतील आणि राज्ये डगमगतील; तो आपला आवाज उंच करील आणि पृथ्वी वितळून जाईल.
कारण तो म्हणतो, “माझ्या शक्तीने व अकलेने मी वागलो आहे. मी सुज्ञ आहे, व राष्ट्रांच्या सीमा मी काढून टाकल्या आहेत, त्यांची भांडारे मी लुटली आहेत व शूर वीराप्रमाणे जे सिहांसनावर बसतात त्यांना खाली पाडले आहे.
समुद्राच्या गर्जनेप्रमाणे गर्जना करणारा पुष्कळ लोकांचा समुदाय आणि महापुराच्या जलांच्या गोंगाटासारखी गोंगाट करणारी राष्ट्रांची गर्दी यांना हायहाय!
¶ पाहा, तू ऐकले आहेस अश्शूराच्या राजांने त्यांच्या सर्व देशांचा पूर्णपणे कसा नाश केला आहे, तर तू सुटशील काय?
त्याने पाहिले की कोणी मनुष्य नाही, आणि कोणी मध्यस्थही नाही. तेव्हा त्याच्याच बाहूने त्याच्याकडे तारण आणले, आणि त्याच्याच न्यायीपणाने त्यास आधार दिला.